Assembly elections 2022: यूपीपासून ते गोव्यापर्यंत भाजपला झटका

Assembly Elections 2022: बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील भाजप आमदार राधाकृष्ण शर्मा यांनी पक्षाचा निरोप घेतला, त्याचवेळी गोव्यातील भाजप आमदार मायकल लोबो आणि प्रवीण झांटे यांनीही पक्ष सोडला
Assembly Elections 2022
Assembly Elections 2022Dainik Gomantak

पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर नेत्यांची धावपळ वाढली आहे. या दरम्यान नेत्यांचे पक्षबदलाचे पर्वही सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला (BJP) दोन धक्के बसले आहेत. यूपीपासून (UP) गोव्यापर्यंतच्या (Goa) आमदारांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. निवडणुकीपूर्वी घडणाऱ्या अशा घटनांमुळे राजकीय पारा चांगलाच तापला आहे.

Assembly Elections 2022
मी निवडणूक लढविणारच! उत्पलनी सुनावले शहांना

उत्तर प्रदेशमधील निवडणुकीपूर्वी बदायूं जिल्ह्यातील बिलसी येथील भाजप आमदार राधाकृष्ण शर्मा यांनी भाजप पक्षाचा निरोप घेतला आहे. ते समाजवादी पार्टीच्या सायकलवरून निवडणूकीच्या रिंगणाकडे निघाले. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व बहाल केले. यापूर्वी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) अध्यक्ष ओम प्रकाश यांनी राजभर दावा केला होता की, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते (दयाशंकर सिंह) सपाच्या संपर्कात आहेत.

लोबो यांनी भाजप सोडला

त्याचवेळी गोव्यातील राजकीय वर्तुळात काल भाजपचे (BJP) आमदार मायकल लोबो यांनी पक्ष सोडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचे मुख्यमंत्री असतानाचे काम राज्यातील लोकांनी पाहिले आहे. भाजपा सरकारला जनता कंटाळली आहे. जनहितासाठी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. माझ्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. पुढे काय पावले उचलायची हे मी ठरवेन. मात्र, कळंगुटची जनता माझ्या निर्णयाचा आदर करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Assembly Elections 2022
पत्नीला तिकीट हवे होते म्हणून लोबोंनी सोडला BJP पक्ष

भाजपचे आमदार प्रवीण यांनी घेतला पक्षाचा निरोप

त्याचवेळी गोव्यातील मये विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रवीण झांटे यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. लोबोंनी काल काँग्रेसमध्ये सपत्निक प्रवेश केला. त्याचवेळी झांटे यांनी महाराष्ट्वादी गोमंतक पक्षाची वाट धरली आहे. निवडणुकीपूर्वी एका दिवसात तीन आमदारांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com