Hyderabad Fire Video: हैदराबादमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग, महिलेसह सहा जणांचा मृत्यू

धुरात गुदमरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Hyderabad Fire Video
Hyderabad Fire Video

Hyderabad Fire Video: तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील सिकंदराबाद भागातील एका बहुमजली व्यापारी संकुलात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या घटनेत महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तपासानंतरच मृत्यूचे कारण कळेल, मात्र धुरात गुदमरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्याने सांगितले की 12 जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यापैकी सहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित लोकांवर उपचार सुरू आहेत.

अधिका-यांनी सांगितले की, मृत्यू झालेले लोक तेलंगणातील वारंगल आणि खम्मम जिल्ह्यातील रहिवासी आहेत.अग्निशमन दलाच्या जवानांनी सात जणांची सुखरूप सुटका केली आहे.

अनेक कार्यालये असलेल्या या बहुमजली इमारतीत सायंकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली. यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव कार्यावर लक्ष ठेवणाऱ्या अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, मध्यरात्रीपर्यंत इमारतीतून धुराचे लोट निघत होते आणि त्यामुळे आग विझवणे कठीण झाले होते.

Hyderabad Fire Video
Goa Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, गोव्यातील भाव जाणून घ्या

चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने स्वप्नलोक संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आणली. अनेक कार्यालये असलेल्या आठ मजली इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत आग पसरली होती.

आग विझवल्यानंतर बचाव कर्मचार्‍यांनी आत अडकलेल्यांचा शोध घेतला. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे समोर आले आहे. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, यावर्षीच जानेवारी महिन्यात सिकंदराबादमधील पाच मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला होता. आगीने उद्ध्वस्त झालेली इमारत नंतर पाडावी लागली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com