पश्चिम बंगालमध्ये सूवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपा नेत्यांवर हल्ला; तृणमूल कॉंग्रेसवर आरोप 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांसाथी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांसाथी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.  तृणमूल कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालचे भाजपाचे उमेदवार सूवेंदू अधिकारी आणि  केशपूरमधील भाजपचे उमेदवार प्रीतीश रंजन यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा उमेदवारांनी त्यांच्या वाहनांवर दगडफेक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान 

या हल्ल्यात शुभेंदू अधिकारी यांच्या कारचे नुकसान झाले नाही, परंतु त्यांच्या ताफ्यातील इतर काही वाहनांचे नुकसान झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये जंगल राज चालू असल्याचा आरोप सूवेंदू अधिकारी यांनी केला. तर दुसरीकडे पूर्व मिदनापूरमध्ये तृणमूल कॉंग्रेसने अर्धा दाजाणहून अधिक मतदान केंद्रावर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे.  जसजसा दिवस वाढत आहे तसतसे बंगाल आणि आसाममधील मतदानाचा वेगही वाढत आहे. बंगालमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत 37.42 टक्के मतदान झाले आहे, तर आसाममध्ये 27.45 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

तर पश्चिम मिदनापूर मधील भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर भाजपच्या महिला कार्यकर्तीला मारहाण केल्याचाही आरोप घोष यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर त्या जेव्हा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या तर त्यांची तक्रारही  नोंदवउण घेतली गेली नाही, असेही घोष यांनी म्हटले आहे. बंगालच्या देबोरा  येथील एक बूथवर भाजपा आणि टीएमसीचे कार्यकर्ते आपसात भिडले. भाजपा उमेदवार भारती घोष यांनीदेखील टीएमसी समर्थकांनी त्यांना धमकावल्याचा आरोप केला आहे.  तर टीएमसीने भाजपवर  मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. 
 

संबंधित बातम्या