पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांच्या वाहनांवर हल्ला; महिला पत्रकार जखमी 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बंगालमध्ये 30 जागांसाठी मतदान होत आहे.  मात्र या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बंगालमध्ये 30 जागांसाठी मतदान होत आहे.  मात्र या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची घटना पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये घडली आहे.  पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर येथे गुरुवारी अज्ञात समुदायाने मीडिया कर्मचार्‍यांच्या वाहनांवर विटा आणि बांबूच्या काठ्यांनी हल्ला केल्याचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. यात काही सशस्त्र पुरुष मीडिया कर्मचार्‍यांच्या वाहनांचा पाठलाग करताना आणि त्यांच्या वाहनांवर हल्ला करताना दिसून येत आहे.  तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक महिला पत्रकार एका माणसाला त्यांची वाहने जाऊ देण्यासाठी विनंती करताना दिसून येत आहे. 

मंदिरात जाऊन प्रार्थना करणे चुकीची आहे का? म्हणत, नरेंद्र मोदींनी साधला ममता...

स्थानिक वृत्तवाहिन्यांनी हे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. केशपूर येथे रिपोर्टिंगसाठी गेले असता त्यांच्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा या माध्यमांनी केला आहे. बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यात गुरुवारी मतदान झालेल्या 30 मतदारसंघांपैकी हा एक मतदार संघ आहे.  यात एक महिला पत्रकारदेखील गंभीर जखमी झाल्याचा दावा माध्यम संस्थेने केला आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. बंगालमध्ये 30 आणि आसाममध्ये 39 जागांसाथी मतदान होणार आहे.

केशपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार तन्मय घोष यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांनी ही घटना घडली. या घटनेसंदर्भात तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. केशपुरात भाजप नेते प्रितीश रंजन कुवार यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच  केंद्रीय दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तर निवडणूक आयोगानेही  प्रशासनाकडे याबाबत अहवाल मागितला आहे.

पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान 

तर पश्चिम बंगालचे भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांच्याही गाडीच्या ताफ्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.  या हल्ल्यात सुवेंदू अधिकारी यांच्या कारचे नुकसान झाले नाही, परंतु त्यांच्या ताफ्यातील इतर काही वाहनांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी नंदीग्रामच्या सतेनगाबारी भागात सुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बंगालचे माजी मंत्रीदेखील जखमी झाले आहेत. शेतात लपून बसलेल्या  लोकांनी सुवेंदू अधिकारी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगदफेक  करण्यात आली.  यात त्यांच्या मागून येणाऱ्या मीडियाच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.  
 

संबंधित बातम्या