Ayodhya Masjid बाबत योगी सरकारचा मोठा निर्णय, बांधकामाबाबत आले 'हे' अपडेट

Ram Mandir Construction: अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) शुक्रवारी धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली.
Ayodhya Masjid
Ayodhya MasjidDainik Gomantak

Ram Mandir Construction: अयोध्या विकास प्राधिकरणाने (ADA) शुक्रवारी धन्नीपूर मशिदीच्या बांधकामाला अंतिम मंजुरी दिली.

बाबरी मशीद-रामजन्मभूमी निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जमीन दिली होती, ज्यावर 'इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशन' ट्रस्ट मशीद, रुग्णालय बांधणार आहे. संशोधन संस्था, कम्युनिटी किचन आणि लायब्ररीचे बांधकाम करायचे आहे.

दरम्यान, एडीएने मंजूरी न दिल्याने आणि जमिनीचा वापर बदलल्यामुळे मशिदीचे बांधकाम दोन वर्षांहून अधिक काळ रखडले होते.

अयोध्येचे विभागीय आयुक्त आणि एडीएचे अध्यक्ष गौरव दयाल यांनी शनिवारी सांगितले की, 'आम्ही शुक्रवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत अयोध्या (Ayodhya) मशिदीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. काही विभागीय औपचारिकतेनंतर मंजूर झालेले नकाशे काही दिवसांत इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे सुपूर्द केले जातील.'

Ayodhya Masjid
Ayodhya Deepotsav अयोध्यानगरीत अलौकिक दीपोत्सव; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले की, 'सर्व मंजुरी मिळाल्यानंतर एक बैठक घेतली जाईल आणि मशिदीच्या बांधकामाची योजना अंतिम केली जाईल.'

हुसैन पुढे म्हणाले की, 'ट्रस्टची बैठक 21 एप्रिल रोजी संपणाऱ्या रमजाननंतर होणार आहे. त्या बैठकीत मशिदीचे बांधकाम सुरु करण्याची तारीख निश्चित केली जाईल.'

हुसैन पुढे असेही म्हणाले की, 'आम्ही 26 जानेवारी 2021 रोजी मशिदीची पायाभरणी केली, अयोध्या मशिदीची पायाभरणी करण्यासाठी आम्ही हा दिवस निवडला कारण सात दशकांपूर्वी याच दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली.'

हुसैन म्हणाले की, 'धनीपूर मशीद बाबरी मशिदीपेक्षा मोठी असेल. धन्नीपूर मशिदीचे ठिकाण तीर्थनगरीतील राम मंदिराच्या जागेपासून 22 किमी अंतरावर आहे.'

Ayodhya Masjid
Babri Masjid: केवळ बाबरीच नव्हे तर 'याठिकाणी' देखील मशिदींच्या आधी होती हिंदू मंदिरं, वाचा..

दुसरीकडे, अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात मशीद, रुग्णालय, संशोधन संस्था, सामुदायिक स्वयंपाकघर आणि ग्रंथालयाच्या बांधकामासाठी मंजुरीसाठी जुलै 2020 मध्ये अयोध्या विकास प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला होता.

9 नोव्हेंबर 2019 रोजी एका ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचे आदेश दिले होते. सरकारला (Government) मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्यास सांगितले होते.

तसेच, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम सुरु आहे. मंदिराच्या बांधकामावर कार्यरत असलेल्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, मंदिर जानेवारी 2024 मध्ये भाविकांसाठी खुले होईल. देशातील पुढील सार्वत्रिक निवडणूक देखील 2024 मध्ये होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com