आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनावरील खास औषधाचा दावा; दवाखान्याबाहेर लोकांची झुंबड

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 19 मे 2021

या औषाधामध्ये मिरे, कापूर, जिरे, मध आणि दालचिनी या पदार्थांचा वापर  करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Second Wave) पाहता एका आयुर्वेदिक डॉक्टरने आपल्याकडे कोरोनावरील चमत्कारी औषध असल्याचा दावा केला आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्या दाव्याला भुलुन लोकांनी रुग्णालयासमोर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) नेल्लोरमधल्या कृष्णटनम या गावातील ही घटना आहे. 

देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिवसेंदिवस  कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत काही महाभाग लोकांना फसवत आहेत. असाच दावा एका डॉक्टर महाशयांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून अनेक लोक या डॉक्टरच्या रुग्णालयासमोर रांगा लावत आहेत. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णालयाबाहेर तीन प्रकारच्या रांगा लागत आहेत. एक कोरोना रुग्णांची आहे, दुसरी रांग ताप आणि इतर लक्षणं असलेल्यांची आहे, तिसरी रांग रोगप्रतिकारकशक्ती वाढवू इच्छिणाऱ्यांची आहे. (Ayurvedic doctor claims special medicine on corona A crowd of people outside the hospital)

COVID-19 Vaccination: ''गावाचं 100 टक्के लसीकरण करा आणि मिळवा 10 लाख...

बोनिगी आनंद (Bonigi Anand) असं या आयुर्वेदिक डॉक्टरचं नाव आहे. त्याने चार औषधे तयार केली आहेत. या औषाधांना तो चार अंकानी ओळखतो. पी- फुफ्फुसाच्या इन्फेक्शनसाठी, एफ- शरिरामधील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी, एल- यकृताच्या आरोग्यासाठीचं औषध आणि के- गंभीर रुग्णांसाठी आहे.

या डॉक्टरच्या मतानुसार, या औषाधामध्ये मिरे, कापूर, जिरे, मध आणि दालचिनी या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. या औषधांच्या तपासणीसाठी केव्हीएन चक्रधन बाबू यांनी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी, आयुष विभागाचे अधिकारी यांची टीम तैनात केली आहे. या डॉक्टरकडे एवढी मोठी गर्दी आहे, कारण या डॉक्टरचं हे औषध गुणकारी ठरत आहे. आणि आतापर्यंत तरी या औषधाचे कोणतेही साइड इफेक्ट्स नोंदवण्यात आलेले नाहीत.

संबंधित बातम्या