येडियुरप्पांचा केंद्रीय नेतृत्वाला इशारा

कर्नाटक(Karnataka) भाजपमध्ये(BJP) दोन गटांचा वाद आता अधिकच वाढताना दिसतोय. एकीकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा(B. S. Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत
 येडियुरप्पांचा केंद्रीय नेतृत्वाला इशारा
B. S. Yediyurappa message to BJP HighcommandDainik Gomantak

कर्नाटक(Karnataka) भाजपमध्ये(BJP) दोन गटांचा वाद आता अधिकच वाढताना दिसतोय. एकीकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा(B. S. Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत तर दुसरीकडे याच या पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी लिंगायत मठांच्या प्रमुखांना आपल्या पाठीशी उभे केले आहे याचाच अर्थ येडियुरप्पा आता थेट केंद्राला आव्हान देत आहेत की, जर त्यांना मुख्यमंत्री पदावरवरून हटवल्यास राज्यातील लिंगायत समाजात असंतोष निर्माण होईल.

येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाकडून याअगोदरच पावले उचलण्यास सुरवात झाली असून त्याच पार्शवभूमीवर येडियुरप्पा यांनादिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती.त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा(JP Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांचीही भेट घेतली होती. या भेटीत येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी येडियुरप्पांनी प्रकृतीचे कारण पुढे केले होते, अशी माहिती होती मात्र येडियुरप्पांनी ही बातमी खोटी आहे असे सांगत मी फक्त कर्नाटकच्या विकासकामांसाठी भेटलो असल्याचे सांगितले होते. राजीनाम्यची बातमी फक्त अफवा असून मला कोणीच राजीनामा मागितला नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते मात्र राज्यात अजूनही त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरूच आहे.

B. S. Yediyurappa message to BJP Highcommand
दैनिक भास्करला मोठा झटका, देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

राज्यातील लिंगायत समाजाचे नेतृत्व म्हणून येडियुरप्पांना पाहिले जाते. पक्षीय भिंती ओलांडूनही अनेक पक्षांतील नेते लिंगायत नेते म्हणून येडियुरप्पांना मान्यता देतात. येडियुरप्पांनी राज्यातील लिंगायत मठांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर सर्व मठाधिपतींनी येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नये, असा इशारा भाजप नेतृत्वाला दिला आहे.

येडियुरप्पांनी बोलावलेल्या बैठकीला वीरशैव-लिंगायत समाजाचे मठाधिपती उपस्थित होते. याचबरोबर समाजातील राजकीय नेतेही उपस्थित होते. राज्यात लिंगायत समाजाची लोकसंख्या 16 टक्के असून, या समाजाचा भाजपला पाठिंबा आहे. याचवेळी येडियुरप्पांनाही या समाजातून अधिक मान्यता आहे. आता याचाच आधार घेत केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट आव्हान देण्याची भूमिका त्यांनी घेतली घेतली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com