Baba Ka Dhabaचे मालक कांता प्रसाद यांनी अखेर युट्युबर गौरव वासनची माफी मागितली

Baba Ka Dhabaचे मालक कांता प्रसाद यांनी अखेर युट्युबर गौरव वासनची माफी मागितली
baba ka dhaba 1.jpg

प्रसिद्ध 'बाबा का ढाबा'चे (Baba Ka dhaba) मालक कांता प्रसाद (kanta Prfasad) यांनी यु ट्युबर (Youtuber) गौरव वासनशी (Guarav Wasan) झालेल्या वादाबद्दल (controversy) माफी मागितली आहे. नुकताच कांता प्रसादचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कांता प्रसाद हात जोडुन माफी (Apology) मागत असल्याचे पहायला मिळते आहे. गौरव वासन, हा मुलगा कधी चोर नव्हता आणि आम्ही त्याला कधीच चोर म्हटले नाही. आम्ही चूक केली असुन आम्ही याबद्दल दिलगीर आहोत आणि जनता-जनार्दनाला सांगु इच्हितो की, जर आमच्याकडुन काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा...या पलीकडे आम्ही तुमच्यासमोर काहीही बोलू शकत नाही. (Baba Dhaba owner Kanta Prasad apologized to YouTuber Gaurav Vasan) 

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये युट्युबर गौरव वासनने दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये असलेल्या बाबा का ढाब्याचा व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर टाकला. हा व्हिडिओ अगदी कमी वेळात खूप लोकप्रिय झाला होता. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर बाबांच्या ढाब्यावर लोकांची प्रचंड गर्दी जमली. कान्ता प्रसादची  यांची बिकट परिस्थिती पाहता बर्‍याच लोकांनी त्यांना मदत केली होती.

यानंतर अचानक कांता प्रसाद यांनी गौरव वासनवर फसवणूकीचा आरोप लावत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पण आता त्यांनी हात जोडुन यूट्यूबर गौरव वासनकडे माफी मागीतली आहे. नुकताच कांताप्रसादांबद्दल आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यानुसार लोकांकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर कांता प्रसाद यांनी स्वत: चे एक रेस्टॉरंट उघडले होते. पण तोटा झाल्यानंतर कांता प्रसाद यांना हे रेस्टॉरंट बंद करावे लागले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com