पाच वर्षांच्‍या मुलांसाठी मिळणार 'बाल आधार कार्ड'

लहानग्यांसाठी आधार कार्ड (Addhar Card)काढण्‍यासाठी त्‍यांच्‍या डोळ्यांचे रेटिना आणि बोटांच्‍या फिंगर प्रिंट देण्‍याची गरज असत नाही. पाच वर्षांच्‍या आतील मुलांचे बायोमेट्रिक (Biometric)नाेंद केली जात आहे.
पाच वर्षांच्‍या मुलांसाठी मिळणार 'बाल आधार कार्ड'
AddharCard Dainik Gomantak

देशात आधार कार्ड सर्वांसाठी अनिवार्य आहे. आधार कार्ड हे एक महत्‍वपूर्ण ओळखपत्र असून सर्वच ठिकाणी याची गरज आहे. आता पाच वर्षांच्‍या आतील मुलांसाठी ‘बाल आधार कार्ड’ (Child Aadhaar Card ')काढण्यात येणार आहे.

बालकापासून ज्‍येष्‍ठ नागरिकांपर्यंत सर्वानाच आधारची नोंदणी करता येते. आधार हे यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) देशातील प्रत्येक नागरिकांसाठी 12 अंकी युनिक (Unique)ओळख क्रमांक आहे. आता पाच वर्षांच्‍या मुलांसाठी ही आधारकार्ड काढण्‍याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

AddharCard
घरी बसून करु शकता आता आधार कार्ड वेरिफाय; फॉलो करा 'या' टिप्स

कशी असेल प्रक्रिया:

UIDAI ’ने लहान मुलांचे आधार काढण्‍यासाठी काही नियम बदलण्यात आले आहे. पालकांना मुलांचे आधार काढण्‍यासाठी जन्‍म प्रमाणपत्र किंवा ज्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये (Hospital)मुलाचा जन्‍म झाला आहे तेथून त्या पावतीच्‍या आधारे आधारकार्ड साठी अर्ज करता येईल. महत्त्वाचे म्हणजे या लहानग्यांसाठी आधार कार्ड काढण्‍यासाठी त्‍यांच्‍या डोळ्यांचे रेटिना आणि बोटांच्‍या फिंगर प्रिंट (Fingerprint)देण्‍याची गरज असत नाही. पाच वर्षांच्‍या आतील मुलांचे बायोमेट्रिक नाेंद केली जात आहे.

अर्ज कसा कराल?

  • सर्वप्रथम ‘UIDAI’च्‍या अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in ला भेट द्या.

  • यानंतर आधार कार्ड नोंदणी हा पर्याय निवडून आवश्‍यक ती सर्व माहिती भरा.

  • या माहिती मध्ये पत्ता, रहिवाशी राज्‍याची माहिती देवून अर्ज सबमिट करा.

  • यानंतर बाल आधार कार्ड नोंदणी करण्‍यासाठी (Appointment ) क्‍लिक करा.

  • जवळच्‍या आधार कार्ड केंद्राची निवड करा आणि Appointment घ्‍या.

  • यानंतर ‘यूआयडीएआय’ कडून तारीख देण्यात येईल. यानंतर संबंधित केंद्रावर जावून तुम्‍ही बाल आधार कार्ड तयार करता येईल.

Related Stories

No stories found.