बलजीत कौरने 8000 मीटरवरील दोन शिखरे सर करुन केला 'रेकॉर्ड'

हिमाचल प्रदेशच्या 27 वर्षीय बलजीत कौरने (Baljit Kaur) दोन आठवड्यांच्या कालावधीत 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची दोन शिखरे सर करुन विक्रम केला आहे.
बलजीत कौरने 8000 मीटरवरील दोन शिखरे सर करुन केला 'रेकॉर्ड'
KanchenjungaDainik Gomantak

हिमाचल प्रदेशच्या 27 वर्षीय बलजीत कौरने दोन आठवड्यांच्या कालावधीत 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची दोन शिखरे सर करुन विक्रम केला आहे. पीक प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक पासांग शेर्पा यांनी सांगितले की, बलजीत कौरने गुरुवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:20 वाजता कांचनजंगा (Kanchenjunga) (8586 मीटर) शिखर सर केले. हे जिंकल्यानंतर ती तिसऱ्या कॅम्पमध्ये पोहोचली आणि तिथून बेस कॅम्पवर परतत आहे.

Kanchenjunga
यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, महाराष्ट्रातील 5 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर

यापूर्वी 28 एप्रिल रोजी तिने अन्नपूर्णा (8091 मीटर) शिखर सर केले होते. शेर्पाच्या म्हणण्यानुसार, या मोसमात तिची 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची ही दुसरी चढाई होती. आता ती जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से (8516 मीटर) जिंकण्याची योजना आखत आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राची (Maharashtra) प्रियांका मोहिते 8,000 मीटरवरील पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.