बर्ड फ्लूचा वाढता प्रार्दुभाव केरळमधून येणाऱ्या कोंबड्यावर बंदी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

राजस्थान, करेळ, हिमाचल प्रदेशसह सहा राज्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रसार मानवाची चिंता वाढवत आहे.केंद्रसरकारकडून या राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे

केरळ : राजस्थान, केरळ, हिमाचल प्रदेशसह सहा राज्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रसार मानवाची चिंता वाढवत आहे.केंद्रसरकारकडून या राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.त्याचबरोबर या सहा राज्यांनी कृती कार्यक्रम योजनांद्वारा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता केंद्राने सूचना केल्या आहेत.दिल्ली लगतच्या हस्तसल गावात अचानक 16 पक्षांचा मृत्यू झाल्याने त्यांचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

केरळमधील दोन बाधित जिल्ह्यामधील कत्तल प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याचं एका अधिकारीक निवेदनात सांगण्यात आलं आहे.ज्या राज्यांमध्ये बर्ड प्लूचा प्रसार झालेला नाही त्यांना अचानक पक्षांचा मृत्यू झाल्यास त्वरित माहिती द्यावी असं सांगण्यात आलं आहे.केरळ,हिमाचल प्रदेश,हरियाणा या बाधित राज्यामध्ये केंद्राची पथके पाठवली आहेत.हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात काही मृत पक्षांचे नमुने घेतले असता बर्ड प्लूमुळे निष्पण्ण झालेल्या 1 लाख 60 हजार कोंबड्याची कत्तल करण्यात आली असल्याचे राज्याचे कृषीमंत्री जे.पी.दलाल यांनी सांगितले.तसेच दक्षिण कन्नडमध्ये केरळमधून आणण्यात येत आसलेल्या कोंबड्यावर बंदी घालण्यात आली आसल्याचं उपायुक्तांनी सांगितलं.बर्ड पलू ला रोखण्यासाठी केंद्रसरकार राज्यसरकारे युध्दपातळीवर प्रयत्न करत आहेत

संबंधित बातम्या