ये हुई ना बात! बाक तोडून दूर करण्याचा प्रयत्न, मांडीवर बसून तरुणाईचं अनोखं उत्तर

तरूणांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात, इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मांडीवर बसून प्रशासनाला दिलं उत्तरं
kerala students laptop protest
kerala students laptop protestTwitter

तिरुवनंतपुरम: तरूणांनी ठरवलं तर ते काहीही करू शकतात हे त्रिकाल सत्य आहे. असाच पराक्रम केरळमधील महाविद्यालयीन विद्यार्थी सध्या अनोखे आंदोलन करून करत आहेत. या आंदोलनाला त्यांनी 'लॅपटॉप प्रोटेस्ट' (Laptop protest) असे नाव दिले. बसस्थानकाच्या अवघ्या तीन फोटोंच्या माध्यमातून 83 वर्ष जुन्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'मॉरल पोलिसिंग' विरोधात धाडसी कारवाई केली. (Kerala students protest)

मात्र, ‘व्हायरल वेटिंग शेड’ लवकरच इतिहासाचा भाग होणार. कारण महापालिकेने ते तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम रेल्वे स्टेशनच्या उत्तरेस 13 किमी अंतरावर स्थित केरळमधील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय, सामान्यतः CET म्हणून ओळखल्या जाते. त्रिवेंद्रम अभियांत्रिकी महाविद्यालय हे खूप प्रसिद्ध कॉलेज आहे. हा सीईटी कॅम्पस, 250 एकर जागेवर पसरलेला, देशातील सर्वात मोठ्या कॅम्पसपैकी एक आहे. या कॅम्पसच्या बाहेर बस निवारा आहे, जो बहुतेक विद्यार्थ्यांच्या आवडीचे ठिकाण आहे. जिथे पुरुष आणि महिला विद्यार्थी शेडमधील एका लांब स्टीलच्या बाकावर बसतात आणि एकमेकांशी बोलू लागतात. मात्र ते एकमेकांसोबत बोलत असताना सोबत किंवा एकमेकांच्या मांडिवर बसतात.

kerala students laptop protest
kerala students laptop protestTwitter

दरम्यान,मंगळवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या समोर एक विचित्र घटना घडली. 'मॉरल पोलिसिंग'ला प्रतिसाद म्हणून केरळमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मांडीवर बसलेले फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. कॉलेज ऑफ इंजिनियरिंग त्रिवेंद्रम (CET) च्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यानंतर तिरुअनंतपुरमचे महापौर आर्य एस राजेंद्रन यांनी परिसराला भेट दिली. याआधी बसस्थानकावरील भागात मुला-मुलींना एकत्र बसू नये म्हणून कथित नैतिकतेच्या नावाखाली तीन स्वतंत्र सीट करण्यात आल्या होत्या.

kerala students laptop protest
बंगालमधील तरुणांना जडलं विचित्र व्यसन; नशेसाठी करतायेत कंडोमचा वापर

खरंतर, मुले आणि मुली एकत्र बसू नयेत म्हणून तीन आसनी लांबलचक बेंच प्रत्येकी एका सीटमध्ये कापून टाकण्यात आली होती. जिथे 5 ते 6 लोक एकत्र बसू शकत होते तिथे आता फक्त तीन लोक बसायला जागा होती. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी'लॅपटॉप आंदोलन' सुरू केले.

kerala students laptop protest
kerala students laptop protestTwitter

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या गटाला हे आवडले नाही आणि त्यांनी ‘मॉरल पोलिसिंग’ विरोधात आपला आक्षेप नोंदवण्याचा एक नवीन मार्ग शोधला. दरम्यान मुला-मुलींचा एक गट एकमेकांच्या मांडीवर बसला आणि फोटो क्लिक केले आणि त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर केले. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये लवकरच बस स्टॉपची फोटो दिसू लागली. काही वेळातच इतर विद्यार्थीही त्यांच्या विद्यार्थी मित्रांसोबत बस स्टॉपवरून फोटो काढण्यासाठी सामील झाले.

kerala students laptop protest
kerala students laptop protestTwitter

बस स्टॉपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे महापौर आर्य राजेंद्रन यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, “बसस्टॉप हे अनधिकृत बांधकाम असल्याने ते पाडण्यात येईल. आधुनिक पद्धतीचा विचार करून महामंडळाकडून नवीन बसस्थानक बांधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आर्य राजेंद्रन यांनी 2021 मध्ये महापौरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा शहरातील महाविद्यालयात ते पदवीचे विद्यार्थी होते.

kerala students laptop protest
'Agnipath Scheme वर चर्चा होऊ दिली नाही', विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला सभात्याग

1939 मध्ये स्थापन झालेली सीईटी यापूर्वीही 'अन्याया'विरोधात आवाज उठवत आली आहे. काही वर्षांपूर्वी, विद्यार्थ्यांच्या एका गटाने कॉलेजच्या वसतिगृहांमध्ये रात्रीच्या कर्फ्यूला विरोध केला होता आणि त्यात त्यांना यशही आले होते. महिला विद्यार्थिनींसाठी संध्याकाळी 6.30 च्या अंतिम मुदतीच्या निषेधार्थ सुरू केलेल्या त्यांच्या तीन महिन्यांच्या 'आझादी' आंदोलनानंतर सरकारला वेळ बदलून रात्री 9.30 पर्यंत परिपत्रक जारी करणे भाग पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com