देशातील राहण्यायोग्य शहरांमधे बेंगळुरू पहिल्या स्थानी; तर पणजी सोळाव्या स्थानी (वाचा संपूर्ण यादी)

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 4 मार्च 2021

केंद्र सरकारने आज देशातील राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बेंगळुरूला देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे.

केंद्र सरकारने आज देशातील राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बेंगळुरूला देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये प्रथम स्थान देण्यात आले आहे. तर पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोईमतूर, वडोदरा, इंदोर आणि ग्रेटर मुंबई या शहरांना यादीत पहिल्या दहा मध्ये स्थान मिळाले आहे. त्यानंतर नवी दिल्लीला या यादीत 13 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. दहा लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचे रहिवासी वर्गात मूल्यांकन करण्यात आले. 

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यादीत श्रीनगरला शेवटचे स्थान मिळाले आहे. त्यानंतर कमी लोकसंख्या असलेल्या 111 शहरांचे देखील मूल्यांकन करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही यादी जाहीर केली. याशिवाय दहा लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शिमलाने पहिले स्थान मिळवले आहे. तर नवी दिल्ली नगरपरिषदेने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या श्रेणीत नगरपालिका कामगिरी निर्देशांकात प्रथम क्रमांक मिळविला आहे. व पणजीला या यादीत सोळावे स्थान मिळाले आहे. आणि इंदोरने दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिका गटात अव्वल स्थान मिळवले आहे.

देशातील राहण्यायोग्य शहरांची यादी जाहीर केल्यानंतर हरदीपसिंग पुरी यांनी, शहरांची निवड ही स्मार्ट सिटी किंवा स्मार्ट सिटी नसलेल्या शहरांमध्ये केलेली नसून, स्मार्ट शहर व क्षयग्रस्त शहर यांच्यात केलेली असल्याचे सांगितले. तसेच स्मार्ट सिटी शहरी कायाकल्प, शासन, उत्तरदायित्व आणि राहणीमान सहजतेविषयी असल्याचे हरदीपसिंग पुरी यांनी नमूद केले. याव्यतिरिक्त, स्मार्ट सिटी प्रकल्प हा जगात कुठेही वेगाने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांपैकी एक असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.     

दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राहण्यायोग्य शहरांची यादी -  

1. बेंगळुरू 66.70

2. पुणे 66.27

3. अहमदाबाद 64.87

4. चेन्नई 62.61

5. सूरत 61.73

6. नवी मुंबई 61.60

7. कोयंबटूर 59.72

8. वडोदरा 59.24

9. इंदूर 58.58

10. बृहत्तर मुंबई 58.23

11. ठाणे 58.16

12. कल्याण डोंबिवली 57.71

13. दिल्ली 57.56

14. लुधियाना 57.36

15. विशाखापट्टणम 57.28

16. पिंपरी चिंचवड 57.16

17. सोलापूर 56.58

18. रायपूर 56.26

19. भोपाळ 56.26

20. राजकोट 55.94

21. जोधपूर 55.80

22. मदुरै 55.78

23. जयपूर 55.70

24. हैदराबाद 55.40

25. नागपूर 55.33

26. लखनऊ 55.15

27. वाराणसी 54.67

28. कानपूर 54.43

29. चंदीगड 54.40

30. गाझियाबाद 54.31

31. ग्वाल्हेर 53.72

32. प्रयागराज 53.29

33. पाटणा 53.26

34. औरंगाबाद 52.90

35. आग्रा 52.58

36. मेरठ 52.41

37. हुबली धारवाड 51.39

38. नाशिक 51.29

39. वसई विरार 51.26

40. फरीदाबाद 51.26

41. विजयवाडा 50.35

42. रांची 50.31

43. जबलपूर 49.94

44. कोटा 49.52

45. अमृतसर 49.36

46. गुवाहाटी 48.52

47. बरेली 47.73

48. धनबाद 46.96

49. श्रीनगर 42.95

दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या राहण्यायोग्य शहरांची यादी -

1. शिमला 60.90

2. भुवनेश्वर 59.85

3. सिल्वासा 58.43

4. काकीनाडा 56.84

5. सालेम 56.40

6. वेल्लोर 56.38

7. गांधीनगर 56.25

8. गुरुग्राम 56.00

9. दावणगेरे 55.25

10. तिरुचिराप्पल्ली 55.24

11. अगरतला 55.20

12. अजमेर 54.89

13. पुडुचेरी 54.78

14. दीव 54.64

15. करनाल 54.48

16. पणजी 54.44

17. तिरुनेलवेली 54.04

18. तिरुप्पूर 54.03

19. वारंगल 54.01

20. मंगलोर 53.95

21. तिरुवनंतपुरम 53.93

22. करीमनगर 53.27

23. तुमकुरु 53.06

24. इरोड 52.87

25. सागर 52.86

26. शिवमोगा 52.86

27. जम्मू 52.49

28. बिहार शरीफ 52.42

29. देहरादून 52.41

30. भागलपूर 52.19

31. तंजावर 52.18

32. जालंधर 52.18

33. उज्जैन 52.04

34. झांसी 51.71

35. शिलाँग 51.65

36. कावरट्टी 51.58

37. धर्मशाला 51.51

38. मुरादाबाद 51.43

39. कोची 51.41

40. रायबरेली 51.21

41. गंगटोक 51.18

42. पोर्ट ब्लेअर 51.13

43. थुथुकुडी 51.12

44. सहारनपुर 50.91

45. अमरावती 50.38

46. ​​तिरुपती 50.33

47. बेलागावी 50.28

48. उदयपूर 50.25

49. कोहिमा 49.87

50. इम्फाल 49.64

51. दाहोद 49.40

52. बिलासपुर 49.19

53. इटानगर 48.96

54. राउरकेला 48.89

55. पासीघाट 48.78

56. दिंडीगुल 48.34

57. आयझॉल 48.16

58. अलिगड 47.15

59. रामपूर 46.88

60. नामची 46.46

61. सतना 45.60

62. मुझफ्फरपूर 45.53

संबंधित बातम्या