Bareilly: गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार, न्यायासाठी पीडितेने गाठले SSP कार्यालय

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
 Crime
Crime Dainik Gomantak

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. गँगरेपनंतर तीन महिन्यांच्या भ्रूणाचा तिच्या पोटातच मृत्यू झाला. महिलेसोबत सामूहिक बलात्काराची घटना 13 सप्टेंबर रोजी घडली होती. तीन नराधमांनी हे घाणेरडे कृत्य केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एसएसपींनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

महिला 3 महिन्यांची गर्भवती

आरोपींनी तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेवर (Woman) सामूहिक बलात्कार केला. ही महिला काही कामानिमित्त शेतात गेली असता ही घटना घडली. त्याचवेळी, गावातीलच गुंडांनी या महिलेवर बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपी महिलेला तिथेच सोडून पळून गेले.

 Crime
Delhi Raod Accident: दिल्लीच्या सीमापुरीमध्ये भीषण अपघात, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले

मिळालेल्या माहितीनुसार, बराच वेळ पीडिता घरी न पोहोचल्याने कुटुंबातील सदस्य शेतात पाहण्यासाठी गेले असता ती गंभीर अवस्थेत आढळून आली. त्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला तात्काळ खासगी रुग्णालयात भरती केले, जिथे डॉक्टरांनी (Doctors) बाळाचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, तिला वाचवता आले. मात्र, बलात्कारादरम्यान महिलेच्या पोटातच मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. मात्र आता, महिलेचे कुटुंबीय न्यायासाठी न्यायालयाच्या चकरा मारत आहेत.

 Crime
Bihar: बेगुसरायनंतर हाजीपूरमध्ये गोळीबार, मध्यवर्ती चौकात घडली घटना

दुसरीकडे, या घटनेबाबत बिशरत गंज पोलिस ठाण्यात कलम 376 डी, 315 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत पोलीस (Police) अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी पीडित महिला आणि आरोपी पक्ष यांच्यात शेतात वाद झाला होता. यानंतर गावात बैठक घेऊन समझोताही झाला होता. त्याचा लेखी करारनामाही प्राप्त झाला आहे. ते पुढे म्हणाले, घटनेनंतर आता महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासात जे काही समोर येईल, त्याआधारे कारवाई केली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com