Batla House Encounter: अरिझ खानला दिल्ली न्यायालयाने ठरवलं दोषी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

आरोपी अरिझ खानचा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे दिल्ली न्यायालयाने सांगितले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इन्स्पेक्टर मोहन चंद शर्मा यांची हत्य़ा करण्यात आली होती. या प्रकरणामधील मुख्य आरोपी अरिझ खान याला दिल्ली न्यायालयाने अखेर सोमवारी दोषी ठरवले. आरोपी अरिझ खानचा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे दिल्ली न्यायालयाने सांगितले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती संदीप यादव यांनी निकाल जाहीर करताना स्पष्ट केलं की, ''फिर्यांदीने दिलेल्या पुराव्यावरुन हा खटला सिध्द झाला आहे. आणि या प्रकारणात आरोपी दोषी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. हे सिध्द झाले आहे की, आरोपी अरिझ खान चकमकी दरम्यान पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला होता. त्याला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला असतानाही तो न्यायालयात उपस्थित राहिला नव्हता.'' आरोपी अरिझ खानला भारतीय दंड संहिता कलम 186, 333,353,302,307,174A, 34A या शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते. आता यापुढे न्य़ायालयाकडून आरोपीला शिक्षा किती प्रमाणात होणार आहे, यावर सुनावणी होईल.

 संसदेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळायला हवं"

11 सप्टेंबर 2008 मध्ये दक्षिण दिल्लीमधील बाटला हाऊसमधील प्लट नबंर 18 मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या सहा दिवसांनी बाटला हाऊसमधील चकमक घडली होती. या चकमकीमध्ये 26  लोक ठार झाले होते. याच चकमकीमध्ये इंन्स्पेक्टर शर्मा आणि दोन दहशतवादी ठार झाले होते.

जुलै 2013 मध्ये न्यायालयाने इंडियान मुजाहिदीनचा दहशतवादी शहाजाद अहमद याला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र ट्रायल न्यायालयाच्या विरोधात त्याची याचिका अद्याप उच्च न्य़ायालयात प्रलंबित आहे. या चकमकीदरम्यान पळून गेलेल्या अरिझला फेब्रुवारी 2018 मध्ये नेपाळमधून पकडून आणण्यात आले. 

संबंधित बातम्या