''कोरोना विरोधातील लढाई 'आम्ही विरुध्द तुम्ही' नसून 'आपण विरुध्द कोरोना''

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 27 एप्रिल 2021

आपणा सर्वांची लढाई ही कोरोना विरोधात आहे.

देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. रोज लाखांच्या संख्येत कोरोनाबाधित वाढत आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यूतही मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. या कोरोना महामारीच्या काळात जगभरातील अनेक देशांनी भारताला (India) मदतीचा हात पुढे केला आहे. दुसरीकडे मात्र अद्याप देशातील राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक कोरोना काळात विविध मुद्द्यांवर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना विरोधातील लढाई  ही ‘आम्ही विरोधी तुम्ही नाही’ तर ‘आपण विरुध्द कोरोना’ अशी आहे. विशेष म्हणजे ही लढाई आपण सर्वांनी मिळून एकजूटीने लढाईची आहे. त्यासाठी राजकीय मतैक्य हे खूप गरजेचं आहे, असं मत कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्यक्त केलं आहे. याच दरम्यान  राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली आहे. (The battle against Corona is not us against you but you against Corona)

‘’मोदी सरकारने हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की, आपणा सर्वांची लढाई ही कोरोना विरोधात आहे. कॉंग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांच्या विरुध्द नाही.’’ असं राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटलं होतं. तसेचं कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या विधानाची बातमी सुध्दा शेअर केली आहे.

नर्स-डॉक्टर्सचा काळा बाजार! 25 रुपयांच्या नकली 'रेमडीसीव्हीर'ची...

यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी ‘’रोजगार आणि विकासाप्रमाणे कोरोनाची खरी आकडेवारी मोदी सरकार जनतेपर्यंत पोहचू देत नाही तर माहामारीचं सत्य देखील नियंत्रणात केलंच आहे.’’ अशी देखील केंद्र सरकार टीका केलेली आहे.

तसेच,  ‘’व्यवस्था फेल आहे, म्हणून ‘आता जन की बात’ करणं महत्त्वाचं आहे. या कोरोना संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. माझी सर्व कॉंग्रेस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून देशातील जनतेला मदत करा, सर्व प्रकारचं दु:ख दूर करा. कॉग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे,’’ असंही राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे.

याशिवाय ‘’कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरु शकतो. मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीयू बेडच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे,’’ असं देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून म्हणाले होते.
 

संबंधित बातम्या