JNU-DU नंतर FTII मध्ये विद्यार्थी संघटनेने दाखवली 'इंडिया: द मोदी क्वेशन' डॉक्युमेंट्री

India: The Modi Question: आता जेएनयुनंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थी संघटनेने 2002 च्या गुजरात दंगलीवरील वादग्रस्त बीबीसीचा हा माहितीपट प्रदर्शित केला आहे.
FTII
FTII Dainik Gomantak

India: The Modi Question: बीबीसीने काही दिवसांपूर्वी 'इंडिया: द मोदी क्वेशन'ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित केली होती . मात्र ही डॉक्युमेंटरी वादग्रस्त ठरली असून केंद्रीय प्रसारमंत्रालयाने बीबीसीने प्रदर्शित केलेली डॉक्युमेंटरी बंद करण्याचे आदेश दिले होते.

तेव्हापासून या डॉक्युमेंटरीवरुन वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. जेएनयुमध्येसुद्धा ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यावरुन वाद झाले होते. आता जेएनयुनंतर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थी संघटनेने 2002 च्या गुजरात दंगलीवरील वादग्रस्त बीबीसीचा हा माहितीपट प्रदर्शित केला आहे.

या माहितीपटाचे नाव 'इंडिया: द मोदी क्वेशन'असून केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात ट्विटर आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील माहितीपटाच्या लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले होते.

मंत्रालयाने माहितीपटात वस्तुनिष्ठतेचा अभाव आहे आणि वसाहतवादी मानसिकता प्रतिबिंबित झाली आहे असे म्हणत या माहितीपटावर बंदी घातली होती. FTII स्टुडंट्स युनियनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साहित्य, संगीत आणि अलीकडच्या काळात इतिहासातील प्रसारमाध्यमांवर बंदी घालणे हे ढासळत चाललेल्या समाजाचे लक्षण आहे, असे विद्यार्थी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

FTII
Guwahati HC Jeans Row: जीन्स घालून हायकोर्टात आला वकील... न्यायालयाने केली 'ही' कारवाई

दरम्यान, यावर एफटीआयआयचे सय्यद रबी हाश्मी यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या एका गटाने डॉक्युमेंटरी दाखवली असून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. गेल्या काही दिवसांपासून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली( Delhi ) विद्यापीठ आणि राष्ट्रीय राजधानीतील आंबेडकर विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांनी बीबीसीचा वादग्रस्त माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. केरळ( Kerala )मधील काँग्रेसने गुरुवारी या कार्यक्रमाचे स्क्रीनिंग केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com