सणासुदीच्या काळात खरेदी करताना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या: पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

सणासुदीच्या काळात संयम राखत, खरेदी करताना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमातून केलं.

नवी दिल्ली: सणासुदीच्या काळात संयम राखत, खरेदी करताना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमातून केलं.मन की बात कार्यक्रमाचा हा 70 वा भाग होता. 
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात.

यावेळी त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या. यावेळी सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांना उद्द्शून, पूर्ण देश आपल्याबरोबर आहे, तसेच ज्यांचे पुत्र आणि कन्या आज सीमांवर तैनात आहेत, त्या कुटुंबाच्या त्यागाला मी नमन करतो, असं पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकरांचं कौतुक केलं. ते म्हणाले , आजकाल, मल्लखांबसुद्घा, अनेक देशांमध्ये प्रसिद्ध होत आहे. अमेरिकेतील चिन्मय आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली, यात त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. अमेरिकेत आज अनेक ठिकाणी, मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत, असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या