सावधान !  झारखंडमध्ये रुग्णालयात बेड मिळेना, ना स्मशानात जागा

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोनाने  देशभरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह झाली आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच झारखंडची परिस्थितीही फारच बिकट होत चालली आहे.  याठिकाणी कोरोना-संक्रमित रूग्णांची संख्या इतकी वाढली आहे की रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत केवळ वाटच पहावी लागत आहे

कोरोनाने  देशभरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक भयावह झाली आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच झारखंडची परिस्थितीही फारच बिकट होत चालली आहे.  याठिकाणी कोरोना-संक्रमित रूग्णांची संख्या इतकी वाढली आहे की रुग्णालयापासून स्मशानभूमीपर्यंत केवळ वाटच पहावी लागत आहे. राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या रिम्सपासून राजधानीतील सर्व खासगी रुग्णालयेही भरून गेली आहेत.  शहरी भागापासून  ग्रामीण भागातही  मोठ्या संख्येने कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढली आहे.  गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर झारखंडमध्ये दररोज दीड ते दोन हजार कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. (Be careful! Corona patients do not get hospital beds in Jharkhand, No place in the cemetery) 

आता सर्वोच्च न्यायालयही कोरोनाच्या विळख्यात; अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण  

झारखंडमध्ये कोरोनाने मरण पावलेल्या लोकांची संख्याही सतत वाढत आहे. गेल्या दोन दिवसातील सरकारी आकडेवारीनुसार, 34  रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोना-संक्रमित रूग्णांसंख्या इतकी वाढली आहे की, की राज्यातील सर्व रुग्णालयांचे बेड भरले आहेत. रूग्णालयात जागा मिळत नसल्याने अनेक रुग्णानी आपला जीव गमावला आहे.  एकीकडे कोरोना अधिक भयावह होत आहे, तर दुसरीकडे लोकांच्या समस्या वाढत आहेत. एकीकडे नागरिकांच्या  समस्या अधिक आहे आणि मात्र त्यांच्यासाठी सुविधा आपुऱ्य पडत आहेत.  लक्षणे असलेल्या आणि कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरी उपचार केले जात आहेत, परंतु ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना रूग्णालयात नेले जात आहे,  पण रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे रिम्सचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप आणि राज हॉस्पिटलचे जनरल मॅनेजर मनीष यांनी म्हटले आहे.  त्यामुळे या रुग्णांना पुढे घेऊन जायचे तर कुठे जायचे, अशी समस्या रुग्णांच्या नतेवाईकांसमोर निर्माण झाली आहे.  घरी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधाही इतकी सोपी नाही असेही डॉ. विवेक कश्यप यांनी म्हटले आहे. 

हल्ल्यांसाठी दहशतवादी मशिदींचा गैरवापर करतात; पोलीस महानिरीक्षकांनी दिली माहिती

दरम्यान, काही ठिकाणी लॉबींग करूनही लोकांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर  दुसरीकडे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला अंत्यसंस्कारासाठीही खूप संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. रुग्णालायपासून स्मशानभूमीपासून कब्रिस्तानापर्यंत लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत.  वास्तविकत: या धोकादायक आजारामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने अंत्यसंस्कारासाठीही कुटुंबाला सामाजिक उपेक्षेचा सामना करावा लागत आहे. 

इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षाच  
राजधानीतील एकमेव इलेक्ट्रिक स्मशानभूमीतही  लोकांना अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसत आहे. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत 11 मृतदेहांना थांबावे लागले.  त्यातच स्मशानभूमीतील मृतदेह जळणाऱ्या बर्नरमध्ये बोंघड झाल्याने 11 मृतदेह परत पाठवण्यात आले. अशातच ज्या रुग्णवाहिकेतून मोठ्या अडचणीने मृतदेह स्मशानभूमी नेण्यात आला तो मृतदेह  आता पुन्हा रुग्णालयाच्या शवगृहात  ठेवणे फार कठीण काम आहे. रुग्णवाहिकेत मृतदेह बाळगणार्‍या ड्रायव्हरसमोर एक मोठी समस्या अशी आहे की तो जास्त काळ पीपीई कीट घालून  राहू शकत नाही. अशा परिस्थितीत तासनतास प्रतीक्षा करणे ही त्यांच्यासाठी मोठी समस्या बनली आहे.

संबंधित बातम्या