सावधान! पुढील चार आठवडे असतील अत्यंत भयानक 

rajesh bhushan.jpg
rajesh bhushan.jpg

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्वाणीचा इशारा दिला आहे. पुढील चार आठवडे अत्यंत भयानक असतील. अशा परिस्थितीत नागरिकांनी दुर्लक्ष केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केले आहे. देशातील एकूण कोविड प्रकरणांपैकी 92 टक्के रुग्ण बारे झाले आहेत. तर 1.3 टक्के कोरोना बंधितांचा आपले प्राण गमवावे लागलेत.  तर सुमारे 6 टक्के नवीन कोविड प्रकरणे अद्याप सक्रिय आहेत.

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील आठवड्याचे सकारात्मकतेचे प्रमाण 6 टक्के इतके होते जे आता 24 टक्क्यांवर पोहचले आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. देशभराच्या तुलनेत महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे आढळून येत आहेत.  देशातील एकूण प्रकरणांमध्ये महाराष्ट्राचा वाटा 58 टक्के इतका आहे. तर कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूची (34 टक्के)  प्रकरणेही महाराष्ट्रात नोंदवली जात आहेत. महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात सरासरी दररोज3000 नवी प्रकरणे समोर येत होती, ज्यात आता वाढ झाली असून टी आता 44000 वर गेली आहे. तर दररोज सरासरी मृत्यूचे प्रमाण देखील 32 ते 250 पर्यंत पोहचले असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली आहे. 

छत्तीसगड एक लहान राज्य असूनही, याठिकाणी कोरोनाचे 6 टक्के प्रमाण आढळून आले आहे. तर मृत्यूचे प्रमाणही 3 टक्क्यांवर पोहचले आहे.  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची सुरूवात झाल्यापासून छत्तीसगडमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असून आता मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. छत्तीसगडमध्ये दररोज 38 मृत्यू तर सरासरी 4900 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे राजेश भूषण यांनी नमूद केले आहे. 

आमचा हेतू कोणत्याही राज्याला दोष देण्याचा नसून एकत्रपणे काम करण्याचा हेतु आहे. तसेच, राज्य सरकारांशी एकत्र मिळून काम  करण्याचादेखील हेतु असल्याचे राजेश भूषण यांनी म्हटले आहे. म्हणून आम्ही छत्तीसगडचा संदर्भ घेत आहोत. छत्तीसगडच्या आसपास मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांत कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे याशिवाय तिथे मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला आरटीपीसीआर चाचणी वाढविण्याची विनंती करण्यात आल्याचे राजेश भूषण यांनी म्हटले आहे. 

त्याचबरोबर, यावेळी त्यांनी पंजाब, दिल्ली आणि हरियाणाची परिस्थिती देखील सांगितली आहे. देशभरात कोरोनाचे 3 टक्के रुग्ण पंजाबमध्ये आहेत, देशातील एकूण कोरोना मृत्यूंपैकी 4 टक्के मृत्यू पंजाब मध्ये होत आहेत. तर सक्रिय केस आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या बाबतीत दिल्ली आणि हरियाणामधील परिस्थिती पंजाबपेक्षा चांगली आहे. पंजाबमधील आरटीपीसीआरचा वाटा 76 टक्के इतका आहे, जो समाधानकारक आहे.  परंतु छत्तीसगडमध्ये त्यात सुधारणा करण्याची गरज आहे. कर्नाटकातही कोरोना प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. मात्र कर्नाटकमध्ये आरटीपीसीआरचा वाटा 90 टक्के म्हणजे समाधानकारक आहे आणि त्यात सातत्याने वाढही  होत आहे. दरम्यान, सोमवारी देशात लसीचे 43 लाख डोस  देण्यात आले,  त्यामुळे आजपर्यंत आपण देशभरात एकूण 8 कोटी 31 लाख डोस दिल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com