सावधान! ओमिक्रॉनच्या नावावर होऊ शकते तुमची फसवणूक

सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन व्हेरियंटची ऑनलाइन चाचणी मोफत देऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सावधान! ओमिक्रॉनच्या नावावर होऊ शकते तुमची फसवणूक

Be careful! You can be deceived in Omicron variant

Dainik Gomantak

नवी दिल्ली : कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनच्या (Omicron) वाढत्या प्रकरणांमध्ये सायबर ठगही सक्रिय झाले आहेत. मोफत चाचणीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक सुचना जारी केली आहे. या सुचनेमध्ये असे म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन व्हेरियंटची ऑनलाइन चाचणी मोफत देऊन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सायबर (Cyber Crime) आणि माहिती सुरक्षा विभाग, गृह मंत्रालयाने एक सुचना जारी केला आहे ज्यात असे लिहिले आहे की, "देशात आलेल्या आरोग्य संकटावर लक्ष केंद्रित करून सायबर सुरक्षीतता त्रुटींचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार अॅक्टिव्ह झाले आहेत. सायबर गुन्हेगार नेहमीच नव्या संधीच्या शोधत असतात. नागरिकांची फसवणूक करण्याचे अनेक मार्ग ते शोधून काढतात. सध्याच्या काळात ओमिक्रॉन हा नवा पर्याय त्यांना मिळाला आहे. अशा प्रकारचे सायबर गुन्हे दररोज वाढत आहेत. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरून हे गुन्हे घडवून आणतात आणि निरपराधांना फसवण्यासाठी वेगाने पसरत असलेल्या कोविड (Covid-19) प्रकरणांचा फायदा घेत असतात."

<div class="paragraphs"><p>Be careful! You can be deceived in Omicron variant</p></div>
15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण नोंदणीला सुरुवात, 'या' लिंकवर करा अर्ज

अशी केली जाते फसवणूक

फसवणूक करणारे ओमिक्रॉन (Omicron) पीसीआर चाचणीसंदर्भात बनावट लिंक्स आणि व्हायरसशी संबंधित फाइल्ससह ईमेल पाठवत आहेत. त्यामध्ये व्यक्तीला विश्वासात घेण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवांच्या नावावर फसवणूक केली जात आहे असे नमूद केले आहे. लिंकवर क्लिक करणाऱ्या संभाव्य पीडितांना फसवणूक करणारे तयार केलेल्या बनावट वेबसाइटवर क्लिक करायला भाग पाडतात जे सरकारी/खाजगी आरोग्य सेवांसारखे असून नागरिक COVID-19 Omicron PCR चाचणीसाठी अर्ज करू शकतात असे त्या ठिकाणी भासवले जाते.

<div class="paragraphs"><p>Be careful! You can be deceived in Omicron variant</p></div>
15 ते 18 वयोगटातील मुलांना दिलेल्या लसीचे दुष्परिणाम आहेत का? DCGI चे मत जाणून घ्या

सावध रहा

या दरम्यान, सायबर ठगांच्या तपशीलाव्यतिरिक्त, बँका संबंधित माहिती देखील विचारत आहेत आणि नंतर फसवणूक करत आहेत. केंद्र सरकारने लोकांना अशी फसवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे आणि अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका असे आवाहन केले आहे. कारण असे करणारे लोक फसवणुकीला बळी पडू शकतात. म्हणून अशा घटनांबाबत cybercrime.gov.in पोर्टलवर सामान्य नागरिक तक्रार दाखल करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com