"आता हेच बघायचं बाकी होतं" बीअर मॅगी ची सोशल मिडियावर रंगलीय चर्चा

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये एक खास मॅगीची विक्री होत आहे. त्याचे नाव  आहे 'बीअर मॅगी.'

ुgeneralनवी दिल्ली: खूप भूक लागल्यानंतर लगेचच  दोन मिनिटांत तुमच्या मनात कुठला विचार येत असेल तर तो नक्कीच मॅगचाच असतो. आजच्या काळात, मुले, विद्यार्थी आणि प्रौढांसाठी मॅगीचे फोस्ट फूड आहे. जे एकटे राहतात त्यांच्या स्वयंपाकघरात तुम्हाला काही मिळाले नाही तरी, मॅगीचे पाकिट नक्कीच सापडतील. मॅगी विक्रीसंदर्भात लॉकडाऊनमध्ये चर्चेत होती. आता दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये एक खास मॅगीची विक्री होत आहे. त्याचे नाव  आहे 'बीअर मॅगी.' मॅगी चा हा व्हिडिओ बघून हेच बघायचं बाकी होतं अश्या प्रतिक्रिया वाचायला आणइ ऐकायला मिळत आहे.

दिल्लीच्या हाऊसफुल रेस्टॉरंटमध्ये ' बीअर मॅगी ' विकली जात आहे. ' बीअर मॅगी ' चा व्हिडिओ SODELHI इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला.  सोया सॉसमध्ये मिसळून तयार केलेली मॅगी बिअर मगमध्ये सर्व्ह केली जाते. व्हिडिओमध्ये, आपण मॅगीला बीअरच्या ग्लासमध्ये बुडलेले पाहू शकता. या पोस्टनंतर इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी बऱ्याच कमेंट्स करण्यास सुरवात केली. 

'बीअर मॅगी' चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर  बर्‍याच लोकांनी टिप्पण्या केल्या. दिशा शर्माने ट्विटर हँडलवरून ' खले या पे ले ' असे विचारले.  आणि काही लोकांनी तर “आता मी सर्व काही पाहिले आहे आणि शांतीने मरू शकतोठ असेही लिहिले आहे.

आणखी वाचा:

हम दो, हमारे दोच्या सक्तीची गरज नाही ? - 

संबंधित बातम्या