बंगाल: निवडणुकीच्या कट्टर वातावरणात 'मोदी' आणि 'ममता' मिठाईचा गोडवा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

आमच्या मिठाई आम्ही स्वत: डिझाइन करतो म्हणून राजकीय पंक्षाच्या निवडणूक चिन्हासह या मिठाई बनवल्या आहे. खेल होबे, आणि जय श्री राम या मिठाई बंगाली लोकांना खूप आवडत आहेत.

कोलकाता: पश्चिम बंगाल निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये गदारोळ सुरू आहे. टीएमसी आणि भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. ममता बॅनर्जी आणि पीएम मोदी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले करत आहेत. परंतु मिठाइच्या दुकानातून ही राजकीय कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मिठाई बनवल्या जात आहे आणि लोक माठ्या संख्यने त्या विकत घेत आहेत. एवढेच नव्हे तरचुरशीच्या निवडणूकीच्या वातावरणात रजकीय अंतर कमी करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

धक्कादायक! गुगलवर सर्च करुन दिलं इंजेक्शन; प्रकरण बेतलं चिमुकल्याच्या जीवावर 

बलराम मल्लिक आणि राधारमण मल्लिक यांनी 1885 मध्ये कोलकात्यात हा मिठाईचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या मिठाई संपूर्ण बंगालमध्ये प्रसिध्द आहेत. परंतु विधानसभा निवडणूकीच्या वेळी त्यांच्या मिठाइची सर्वत्र चर्चा होत आहे. आता सुदिप हा व्यवसाय सांभाळत आहेत.

म्यानमार मध्ये लष्कराने बंड करत लोकनियुक्त सरकारला उलथून पाडले...

बंगालमध्ये निवडणूकीचे वातावरण आहे. आम्ही निवडणूकींबाबत सोशल मिडियावर काय ट्रेंड करतो आहे याकडे जास्त लक्ष देतो. त्यानुसार आमच्या मिठाई आम्ही स्वत: डिझाइन करतो म्हणून राजकीय पंक्षाच्या निवडणूक चिन्हासह या मिठाई बनवल्या आहे. खेल होबे, आणि जय श्री राम या मिठाई बंगाली लोकांना खूप आवडत आहेत.

संबंधित बातम्या