ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

 बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास निधन झाले

कोलकता : ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी (वय ८५) यांचे रविवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास निधन झाले. गेल्या महिन्यात त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर ४० दिवस उपचार घेत होते. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. चॅटर्जी यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

सौमित्र चॅटर्जी यांच्या निधनाचे वृत्त बेले व्ह्यू क्लिनिक या रुग्णालयाने जाहीर करताच पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय हे तातडीने रुग्णालयात पोचले. ‘‘चॅटर्जी हे योद्धे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृद्धीचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे काम कायम लक्षात राहील,’’ अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली. चॅटर्जी यांच्याबरोबर काम केलेले कलाकार आणि दिग्दर्शकांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘मी माझा कौटुंबिक मित्र गमावला आहे,’ असे सत्यजित राय यांचे पुत्र संदीप राय म्हणाले. बंगालमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय आणि सौमित्र चॅटर्जी यांचे समीकरण दीर्घकाळ जुळलेले होते. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरला राय यांच्या ‘अपूर संसार’ पासून सुरुवात झाली होती.

संबंधित बातम्या