आप नेते भगवंत मान 16 मार्च ला घेणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

आप नेते भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Bhagwant Mann & Arvind Kejriwal
Bhagwant Mann & Arvind KejriwalDainik Gomantak

आम आदमी पक्षाचे नेते भगवंत मान 16 मार्च रोजी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 16 मार्चला अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांचा रोड शो होणार आहे. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान (Bhagwant Mann) अमृतसरमध्ये रोड शो करणार आहेत. यातच भगवंत मान 16 मार्चला शपथ घेणार आहेत. मान यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. या शपथविधीला आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे मानले जात आहे. (Bhagwant Mann will be sworn in as Punjab Chief Minister on March 16)

Bhagwant Mann & Arvind Kejriwal
Punjab Assembly Election Result 2022 : अच्छे दिन येणार केजरीवाल यांच्या वाट्याला

दरम्यान, पंजाब विधानसभेत पहिल्यांदाच आम आदमी पार्टी सरकार स्थापन करणार आहे. 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या उमेदवारांनी पंजाबमधील राजकीय दिग्गजांचा धुव्वा उडाला आहे. तसेच, पूर्व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसपासून फारकत घेऊन पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली, त्यांनाही पतियाळा मतदारसंघातून दारुण पराभव पत्करावा लागला. सिद्धू आणि अकाली नेते विक्रम सिंह मजिठिया यांना मागे टाकून जीवनज्योत कौर यांनी अमृतसरमधून निवडणूक जिंकली.

तसेच, आप च्या डॉ. अमनदीप कौर यांनी सोनू सूदची बहीण मालविका सूद यांचा मोगा विधानसभा मतदारसंघातून पराभव केला आहे. जगदीप कंबोज यांनी जलालाबादमधून सुखबीर बादल यांचा 31000 मतांनी पराभव केला. तर दुसरीकडे गुरमीत सिंग खुदियान यांनी लांबीमधून पाच वेळा मुख्यमंत्री भूषवलेले प्रकाशसिंग बादल यांचा 11,500 मतांनी पराभव केला.

शिवाय, पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज यावरुन लावता येतो की, त्यांना जवळपास 50 वर्षांतील दुसरा सर्वात मोठा विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये यावेळी अकाली दलाच्या 4 जागा कमी झाल्या असून त्यांना 11 जागांचे नुकसान झाले आहे. तर 'आप'ला गेल्या वेळी 92 जागा मिळाल्या होत्या आणि 72 जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या असून 59 जागा कमी झाल्या आहेत. पंजाबमध्ये भाजपच्या युतीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला सहन करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com