भारत बंद: देशात या ठिकाणी असणार पर्यायी मार्गही बंद

भारत बंद: देशात या ठिकाणी असणार पर्यायी मार्गही बंद
Bharat Band A group of Farmers protesters sing and dance at Ghazipur border

दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी आज शुक्रवारी 26 मार्च रोजी देशव्यापी भारत बंदचे आवाहन केले आहे.  हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत चालविला जाणार आहे. कोणालाही भारत बंदमध्ये भाग घ्यायला भाग पाडले जाणार नाही, असे शेतकरी नेत्यांनी सांगितले आहे. 


आंदोलकांनी गाझीपूर सीमा बंद केली

12 तास बंदसाठी आंदोलकांनी गाझीपूर सीमा रोखली आहे. संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारच्या विरोधात हा बंद पुकारला असल्याचे सांगितले आहे. किसान मोर्चा या तिन्ही कृषी कायद्यास विरोध करीत असून ते मागे घ्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे. गाजीपूर सीमेवर वाहतूक थांबली गेली आहे.
ट्रॅफिक पोलिसांच्या म्हणण्यानुसार एनएच-24 वरील गाझीपूर सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

दिल्लीच्या सीमेवरील सर्व पर्यायी मार्गही आज बंद राहतील 

दिल्ली सिमेवर ज्या ठिकाणी शेतकर्‍यांचे धरणे सुरू आहेत तेथे पर्यायी मार्गसुद्धा शुक्रवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत बंद राहतील. दिल्लीच्या सीमेवरील निषेध करणार्‍यांची संख्या सध्याच्या तुलनेत सध्या खूपच कमी असली तरी, बंद हे संपूर्णपणे यशस्वी होईल, असा आंदोलकांचा दावा आहे. भारत बंद दरम्यान काही आंदोलकांचा एक गट गाझीपूर सीमेवर नाचताना आणि गातांना दिसत आहे. 


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com