भारत बायोटेकची लस राज्याला 600 तर केंद्राला 150 रुपयांत

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डनंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. याआधी सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारसाठी आणि राज्यासाठी लशीच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं असतानाच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात लशीच्या किंमतीवरून वाद सुरु आहेत. यातच आता सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डनंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. याआधी सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारसाठी आणि राज्यासाठी लशीच्या किंमती जाहीर केल्या आहेत. कोव्हॅक्सिनने जाहीर केलेल्या किंमतीनुसार खासगी रुग्णालयांमध्ये कोव्हॅक्सिन 1200 रुपयांमध्ये तर राज्यांना 600 रुपयांमध्ये मिळणार आहे. 

18 वर्षावरील नागरीकांनी लसिकरणासाठी असं करा रजिस्ट्रेशन 

शनिवारी भारत बायोटेकनं त्यांच्या लशीची दर जाहीर केले. यानुसार राज्य सरकारने कोव्हॅक्सिन 600 रुपयांना तर केंद्र सरकारला 150 रुपयांमध्ये देण्यात येईल. याशिवाय खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांमध्ये ही लस विकत घेता येईल. लशीच्या एक्सपोर्ट ड्युटीची किंमत 15 ते 20 डॉलर इतकी ठेवली आहे. 

Oxygen Shortage : दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू; राहुल गांधींनी केंद्र सरकारला दिला असा सल्ला

याआधी सीरम इन्स्टिट्यूटने लशीची किंमत निश्चित केली होती. यामध्ये कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनची किंमत जास्त आहे. सीरमच्या कोविशिल्डची किंमत खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये इतकी आहे. राज्यांसाठी 400 रुपये इतकी किंमत आहे. केंद्राला ही लस 150 रुपयांना दिली जाते.

संबंधित बातम्या