IRCTC ची पहिली 'भारत गौरव पर्यटक ट्रेन' जूनमध्ये होणार सुरू

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये इन्फोटेनमेंट यंत्रणा बसवण्यात आली आहे.
IRCTC ची पहिली 'भारत गौरव पर्यटक ट्रेन' जूनमध्ये होणार सुरू
Bharat Gaurav Tourist Train Dainik Gomantak

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ची पहिली भारत गौरव पर्यटक ट्रेन 21 जूनपासून सुरू होणार आहे. ही ट्रेन अयोध्या ते नेपाळमधील जनकपूर या भागातील प्रभू श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणांना भेट देणार आहे. हा प्रवास 18 दिवसांचा असेल. (Bharat gaurav tourism train to start from June)

Bharat Gaurav Tourist Train
कोण आहेत माणिक साहा, त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार

आयआरसीटीसीचे सह महाव्यवस्थापक अच्युत कुमार सिंग आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी आनंद झा यांनी शनिवारी आग्रा कॅंटच्या एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये माध्यमांशी संवाद साधला. लखनऊच्या वर्कशॉपमध्ये भारत गौरव ट्रेनचे डबे तयार करण्यात आले आहेत. वातानुकूलित टुरिस्ट ट्रेनला एसी थर्ड क्लास डबे असतील.

प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये इन्फोटेनमेंट यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रत्येक डब्यात सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरेही असतील. सिंग यांनी सांगितले की, टूर पॅकेजमध्ये 18 दिवसांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती शुल्क 62,370 रुपये ठेवण्यात आले आहे. यात प्रवास करणे, एसी हॉटेल्समध्ये राहण्याची सोय, विमा इत्यादी सुविधा आहेत.

Bharat Gaurav Tourist Train
पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका; ज्येष्ठ नेत्यानं केलं पक्षाला ‘गुड बाय’

या ठिकाणांना भेट द्या
दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून धावणाऱ्या भारत गौरव ट्रेनचा पहिला स्टॉप अयोध्येतील श्री राम जन्मस्थान असेल. येथून ट्रेनने बक्सरला जाईल, तेथे विश्वामित्र आश्रम, रामरेखा घाट येथे गंगा स्नान होईल. त्यानंतर ही ट्रेन जयनगरमार्गे नेपाळमधील जनकपूरला जाईल. येथे जानकी जन्मस्थान सीतामढी, रामजानकी मंदिर येथे भेट दिली जाईल.

यानंतर ही ट्रेन काशी मंदिर, सीता संहिता स्थळ, प्रयाग, शृंगवरपूर, चित्रकूट, नाशिकमधील पंचवटी, हंपीनंतर किष्किंधा शहर, तेलंगणातील भद्राचलम नंतर रामेश्वरम, कांचीपुरम येथे पोहोचेल. या दरम्यान 1800 किमीचा प्रवास केला जाणार आहे. ट्रेनमधून 600 यात्रेकरू प्रवास करू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.