अमेरिकन मीडियाने केले भाजपचे कौतुक, '2024 च्या निवडणुकीत...'

Wall Street Journal: अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजपचे वर्णन जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून केले आहे.
PM Narendra Modi & Amit Shah
PM Narendra Modi & Amit ShahDainik Gomantak

Bharatiya Janata Party: देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) अमेरिकन मीडियाने कौतुक केले आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने भाजपचे वर्णन जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून केले आहे.

जर्नलमध्ये असे लिहिले आहे की, 2014, 2019 मध्ये बंपर विजयानंतर 2024 मध्ये भाजप पुन्हा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. आगामी काळात भाजप भारतात वेगाने आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असे जर्नलमध्ये म्हटले आहे.

जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखानुसार, अमेरिकन दृष्टिकोनातूनही भाजप हा सर्वात महत्त्वाचा परदेशी पक्ष आहे, परंतु त्याला कमी लेखण्यात आले आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) ने लिहिले आहे की, 2014 आणि 2019 मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर, भारतीय जनता पक्ष 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. यासोबतच भारत एक मोठी आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत असल्याचेही लिहिले आहे.

PM Narendra Modi & Amit Shah
Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द; CBI चे मौन

भारताशिवाय अमेरिका चीनशी स्पर्धा करु शकत नाही

WSJ च्या या लेखात असे लिहिले आहे की, भारताच्या मदतीशिवाय अमेरिका चीनशी स्पर्धा करु शकत नाही. लेख प्रकाशित झाल्यानंतर भाजप नेते अरुण सिंह म्हणाले की, पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सातत्याने वाढत आहे आणि संपूर्ण जग पीएम मोदी आणि भाजपच्या धोरणांचे कौतुक करत आहे.

43 वर्षात भाजपचा विस्तार कसा झाला हे या आकडेवारीवरुन समजू शकते

1981 मध्ये संपूर्ण देशात भाजपचे केवळ 148 आमदार होते, परंतु आज त्यांची संख्या 1296 आहे.

1984 मध्ये भाजपचे फक्त दोन खासदार होते, पण आज 303 खासदार आहेत.

1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 1.89 कोटी मते मिळाली होती, परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22.89 कोटी मते मिळाली होती. आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. भाजपकडे 17 कोटींहून अधिक कार्यकर्ते आहेत. तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे 9.14 कोटी कार्यकर्ते आहेत.

PM Narendra Modi & Amit Shah
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना मिळू शकतो शांततेचा नोबेल? नॉर्वेहून पुरस्कार समितीचे पथक भारतात...

16 वर्षातील सर्वात मोठा पक्ष

वॉल स्ट्रीट जर्नलने जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष म्हणून ज्या पक्षाचे वर्णन केले आहे, तोच पक्ष आहे ज्याची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लाल-कृष्ण अडवाणी यांनी केली होती. मात्र, भाजप ही विचारधारा म्हणून 1951 सालीच अस्तित्वात आली. त्यावेळी, श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेवर भारतीय जनसंघाची स्थापना केली होती.

तसेच, भाजपने 1984 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांना फक्त 2 जागा मिळाल्या. भाजपने 224 जागांवर आपले उमेदवार उभे केल्याने हा मोठा पराभव होता. मात्र, त्यानंतर भाजपने तळागाळात आपले संघटन मजबूत करण्याचे काम केले आणि स्थापनेच्या अवघ्या 16 वर्षात तो देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला.

PM Narendra Modi & Amit Shah
PM Modi: मोठी बातमी! PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी 8 IPS अन् 1 IAS अधिकाऱ्यावर होणार कारवाई

पहिले सरकार 13 दिवस चालले

1996 च्या लोकसभा निवडणुकीत 161 जागा जिंकल्या आणि देशातील सर्वात मोठा पक्ष बनला. त्यावेळी भाजपने युतीचे सरकार स्थापन केले होते, जे केवळ 13 दिवस सत्तेवर राहिले.

यानंतर, 1998 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आपली रणनीती बदलली आणि अनेक पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएची स्थापना केली.

पण त्यानंतर जयललिता यांचा पक्ष AIADMK ने भाजपचा पाठिंबा काढून घेतला होता, त्यामुळे हे सरकारही 13 महिन्यांतच पडले. मात्र, या 13 महिन्यांत भाजप भारतातील लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला. हीच वेळ होती जेव्हा भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती.

PM Narendra Modi & Amit Shah
PM Modi: कॉंग्रेस माझी कबर खोदण्यात व्यस्त अन् मी... कर्नाटकमधून मोदींचा हल्लाबोल

1999 मध्ये बंपर विजय

1999 मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा भाजपने 183 जागा जिंकल्या आणि हे सरकार स्वतंत्र भारताच्या इतिहासात पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेस सरकार ठरले. हा तोच काळ होता जेव्हा भारताने कारगिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध युद्ध केले आणि त्यात विजय मिळवला.

PM Narendra Modi & Amit Shah
Prime Minister Narendra Modi: PM मोदींच्या भाषणात 'मोदी-अदानी भाई-भाई' च्या घोषणा; पंतप्रधान म्हणाले...

या काळात भाजपकडे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे मोठे नेते होते. पण त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि या निवडणुकांमध्ये भाजपने 282 जागा जिंकल्या. भाजपला इतिहासात पहिल्यांदाच बहुमत मिळाले आहे. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने 303 जागा जिंकल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com