आणि भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी थेट त्याच्या श्रीमुखात लगावली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

अशातच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीवर घुसखोर असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीच्या चक्क कानाखालीच लगावली आहे.

गाझीपूर : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजधानी दिल्लीत  झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला एक  वेगळेच वळण लागले आहे. अशातच भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी एका व्यक्तीवर घुसखोर असल्याचा आरोप करत त्या व्यक्तीच्या चक्क कानाखालीच लगावली आहे.

संबंधित व्यक्ती व्यासपीठावर चढत असतांना त्याला तेथिल शेतकऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तो व्यक्ती व्यासपीठावर  चढण्याचा प्रयत्न करत राहीला. दरम्यान राकेश टिकैत यांना राग अनावर झाला आणि त्यांनी संबधित व्यक्तीच्या जोरदार कानाखाली  लगावली या सगळ्या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीच्या सीमेवर असलेल्या गाझीपूरमध्ये पोलीस फाटा मोठ्या संख्येनं आंदोलस्थळी दाखल झाला होता. आंदोलकांना घटनास्थळावरुन हटवण्यात येणार होतं, मात्र आंदोलकांनी यास नकार दिला. जोवर कायदा मागे घेणार नाही तोवर आम्ही हटणार नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट केले. याचदरम्यान “व्यासपीठावर घुसणारा भाजपचाच घुसखोर होता. जे कोणी इथे वाईट हेतूने आले आहे त्यांनी निघून जावे,” असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले.

Union Budget 2021: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; विरोधकांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार -

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचे नियोजन केले होते. मात्र काही ठिकाणी या रॅलीला हिंसक वळण लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकर्‍यांचे तीव्र आंदोलन आणि दिल्लीतील परिस्थितीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीस गृहसचिव, दिल्ली पोलिस अधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. व या बैठकीत अर्धसैनिक दलाच्या अतिरिक्त कंपन्या दिल्लीत तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

 

संबंधित बातम्या