टाइम मासिकच्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची वर्णी 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

टाइम मासिकच्या 100 उज्वल भविष्य घडवणाऱ्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा यावर्षी समावेश झाला आहे.

दरवर्षी टाइम मासिकची उदयोन्मुख नेत्यांची यादी जाहीर होते. यावर्षी जाहीर झालेल्या 100 उदयोन्मुख नेत्य़ांच्या यादीमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांची वर्णी लागली आहे. ट्वीटरच्या प्रमुख वकिल विजया गड्डे, ब्रिटनच्या अर्थमंत्री ऋषी सनक, इन्स्टाकार्टच्या संस्थापक आणि कार्यकारी प्रमुख अपूर्व मेहता, अपसॉल्व्हचे संस्थापक रोहन पावुलुरी यांचाही टाइम मासिकच्या उदयोन्मुख नेत्य़ांच्या यादीत समावेश झाला आहे.

बुधवारी टाइम मासिकच्या 100 उज्वल भविष्य घडवणाऱ्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांचा यावर्षी समावेश झाला आहे. ‘’आपल्या दलित बांधवांना शिक्षणाच्या माध्यमातून दारिद्र्य़ातून बाहेर काढण्यासाठी शाळा चालवतात. त्य़ाचबरोबर जातीआधारीत झालेल्य़ा हिंसाचाराच्या बळींच्या बचावासाठी मोटारसायकलवरुन गावागावात जावून जाती जातीमधील भेदभाव दूर करण्यासाठी प्रात्यक्षिके करतात’’,असं टाइम मासिकाच्या प्रोपाइलवर म्हटलं आहे.

'सोनार बांगला घडवण्यासाठी बंगालमध्ये सत्ता हवी' 

उत्तरप्रदेशातील हाथरसमध्य़े दलित बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी मोहीम राबवली होती. ''टाइम मासिकच्या यादीमधील प्रत्येक व्यक्ती इतिहास घडवण्यासाठी तयार आहेत, मात्र काहीजण इतिहास पहिल्यांदाच घडवतात'', असं टाइम मासिकच्या संस्थापक डॅन मॅकसाई य़ांनी म्हटले आहे.       
 

संबंधित बातम्या