रँगिंगमुळे मुलीची आत्महत्या; न्यायालयाने चौंघींना सुनावली शिक्षा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

रॅगिंग करणे कायद्याने गुन्हा असले तरी शहरी भागातील मोठमोठ्या कॉलेजमध्ये रॅगिॆग हा प्रकार सर्रास होतांना दिसून येतो. या रॅगिंगमुळे कुणी डिप्रेशनमध्ये जातो, तर कुणी आत्महत्ये सातखा कठोर निर्णय घेतो.

भोपाळ: रॅगिंग करणे कायद्याने गुन्हा असले तरी शहरी भागातील मोठमोठ्या कॉलेजमध्ये रॅगिॆग हा प्रकार सर्रास होतांना दिसून येतो. या रॅगिंगमुळे कुणी डिप्रेशनमध्ये जातो, तर कुणी आत्महत्ये सातखा कठोर निर्णय घेतो. असाच एक प्रकार 8 वर्षापूर्वी भोपाळ येथे घडला होता. आठ वर्षा आधीच्या रॅगिंग आणि आत्महत्येच्या घटनेप्रकरणी भोपाळ जिल्हा कोर्टाने चार मुलींना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय कोर्टाने चारही मुलींवर दोन हजार रुपये दंडही ठोठावला आहे. 6 ऑगस्ट 2013 मध्ये कमलानगर थाना  भोपाळ येथे राहणाऱ्या एका मुलीने घरात फाशी घेवून आत्महत्या केली हेती. एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात अनिता शर्मा शिकत होती, शेवटी तीने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली.

आरकेडीएफ कॉलेजमध्ये ती बी फार्म ला शिकत असतांना ही घटना घडली. पोलिसांनी वेळेत येवून सुयाइड नोट ताब्यात घेतली.  कुटुबियांनी दिलेल्या माहितीवरून आणि सुसाइड नोटच्या आधारावर त्या चार मुलींसह एका शिक्षकाला अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने निकाल देऊन निधि, दीप्ती, कीर्ती आणि देवंशी या चार मुलींना तुरूंगावासाची शिक्षा ठोठावली होती. पुराव्याअभावी महाविद्यालयीन शिक्षक मनीषला निर्दोष सोडण्यात आले. अनिता शर्माने तिच्या सुसाईड नोटवर या चार मुलींची नावे लिहिली होती.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

संबंधित बातम्या