
EOW Raid Bhopal: मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आरोग्य विभागाचे लिपिक हिरो केसवानी यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) छापा टाकला आहे. यावेळी केसवानी यांच्या घरातून 80 लाखांची रोकड मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यासह लिपिक हिरो केसवानी यांनी छापा पडल्यानंतर विष प्राशन केले.
दरम्यान, त्यांना तात्काळ हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगण्यात येत आहे. केसवानी सातपुडा भवनमध्ये तैनात असून त्यांच्या घरात बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या तक्रारीवरुन न्यायालयाचा (Court) आदेश घेऊन ईओडब्ल्यूने छापा टाकला. आतापर्यंतच्या तपासात टीमला 80 लाखांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत.
EOW कारवाई करत आहे
EOW मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मंगळवारी कारवाई करताना दिसले. बेहिशोबी मालमत्ता कमावल्याच्या तक्रारीवर कारवाई करत ईओडब्ल्यूने जबलपूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता आदित्य शुक्ला यांच्या घरावरही छापा टाकला. यादरम्यान अघोषित मालमत्ता आणि गुंतवणुकीशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. तक्रारीच्या आधारे ईओडब्ल्यूने ही कारवाई केली आहे. यामध्ये अभियंत्याच्या घरात उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा 203 पट अधिक मालमत्ता आढळून आली आहे. त्यात त्यांच्या दोन आलिशान घरांचाही समावेश आहे.
जूनमध्ये टिकमगडमध्ये छापे टाकण्यात आले होते
याशिवाय, जून महिन्यात ईओडब्ल्यूने टीकमगड जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थेच्या संचालक मीना रकवार यांच्या घरावर छापा टाकला होता. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडे सुमारे दोन कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे उघडकीस आले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.