पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री भूमीपुत्रच होणार; मोदींनी दिले आश्वासन

पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री भूमीपुत्रच होणार; मोदींनी दिले आश्वासन
Bhumiputra will be the Chief Minister of West Bengal Modi promised

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असून त्यांनी प्रचारसभा घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बंगालच्या भूमीने वंदे मातरम च्या माध्यमातून देशाला एकत्र आणलं, मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लोकांना बाहेरचे संबोधित करत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सत्तेत आल्यास भुमीपुत्रालच पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री करणार असल्याचे म्हटले आहे.

''बंगालची जमीन रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, बंकिमचंद्र चटर्जी अशा महान लोकांची जमीन होती. इथे कोणताही भारतीय बाहेरचा नव्हता. बंगालनेच वंदे मातरम च्या माध्यमातून देशातील जनतेला एकत्र आणले. परंतु ममता बॅनर्जी बाहेरील लोकांबद्दल बोलत आहेत. आपण सर्वजण भारतमातेची मुले आहेत,'' असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत बंगालमधील आणि बंगालबाहेरील असा वाद चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलं आहे. (Bhumiputra will be the Chief Minister of West Bengal Modi promised)

ममता बॅनर्जी निवडणुकांच्या प्रचारसभेत सतत बंगालमध्ये दिल्ली किंवा गुजरातमधून आलेल्या लोकांना बंगालमध्ये राज्य करु देणार नाही असं सांगतच आहेत. यालाच नरेंद्र मोदिंनी उत्तर दिले आहे.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com