‘बिगबास्केट’वर हॅकरचा डल्ला

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020

 तब्बल दोन कोटी युजरचा संवेदनशील डेटा बिगबास्केट या ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरकडून लीक झाला. हे चुकून घडल्याची कबुली या कंपनीने दिली. त्यातच एका हॅकरने हा डेटा ३० लाख रुपयांना विक्रीस ठेवल्याचेही धक्कादायक वृत्त आले. 

नवी दिल्ली :  तब्बल दोन कोटी युजरचा संवेदनशील डेटा बिगबास्केट या ऑनलाईन ग्रोसरी स्टोअरकडून लीक झाला. हे चुकून घडल्याची कबुली या कंपनीने दिली. त्यातच एका हॅकरने हा डेटा ३० लाख रुपयांना विक्रीस ठेवल्याचेही धक्कादायक वृत्त आले. 

पूर्ण नाव, इमेल आयडी, पासवर्ड हॅशेज, संपर्क क्रमांक, पत्ता तसेच आणखी माहिती लीक झाल्याचे व ती ४० हजार डॉलर इतक्या किंमतीला विक्रीस उपलब्ध असल्याचे सायबल कंपनीच्या संशोधन चमूला आढळून आले. डेटाबेसचा एक भाग लिक झाला एसक्यूएल फाईलचा साईज १५ जीबी आहे, ज्यात वैयक्तिक माहितीशिवाय लॉगीन करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसही आहे. सायबल ही अमेरिकी कंपनी आहे. ३१ ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीगबास्केटला तशी कल्पना देण्यात आली.

पोलिसांत गुन्हा
दरम्यान, अशी चोरी झाल्याप्रकरणी हॅकर्सविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. आर्थिक संदर्भातील माहिती सुरक्षित असल्याचा दावा करण्यात
 आला.

कार्डचा तपशील नाही
ग्राहकांची वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित राखण्यास कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य असून डेबिड किंवा क्रेडीच कार्डचा तपशील लिक झाला नसल्याचा दावाही करण्यात आला. हा तपशील स्टोअर केला जात नाही असेही सांगण्यात आले.
लॉकडाउनमुळे प्राधान्य
कोरोनाच्या जागतिक साथीमुळे देशात बहुतांश ठिकाणी लॉकडाउन लागू झाले. या कालावधीत ऑनलाइन माध्यमाला प्राधान्य देण्यात आले. त्यात किराणा माल आणि भाजी खरेदीसाठी अधिकाधिक ग्राहकांनी बीगबास्केटला पसंती दिली. घरपोच वस्तु मिळत असतानाच ॲपमध्ये सुरक्षेशी तडजोड झाल्यामुळे वैयक्तिक माहितीचा फटका बसल्याची मात्र अनेकांना कल्पना नव्हती.

आधीची घटना
गेल्याच महिन्यात हैदराबादमधील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला सर्व्हरमधील डेटाचोरीमुळे आपले सर्व कारखाने बंद ठेवावे लागले होते. स्पुटनीक व्ही या कोरोनावरील रशियन लशीच्या 

ग्राहकांनो, ही काळजी घ्या

एखाद्या इ-कॉमर्स वेबसाइटचा डेटाच हॅक झाल्यास एण्ड युजर म्हणून तुमच्या हातात काहीच राहात नाही. त्यामुळे असा साइट्सवर आपली माहिती देताना ग्राहकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या देशात डेटा चोरीची सरासरी किंमत २०२०मध्ये १४ कोटी रुपयांवर गेली असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ९.४ टक्के वाढ झाली आहे.  अशा चोरीची कारणे कंपन्यांतील स्पर्धा, चुकीच्या सिस्टीम व मानवी चुका आहेत. 
ग्राहकांची पुढील काळजी घेतल्यास नुकसान टळू शकते.  

तुमचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड कोणत्याही पोर्टलवर स्टोअर करू नका.  तुमचा पासवर्ड सातत्याने बदलत राहा. 
 कॅश ऑन डिलिव्हरी हाच पर्याय स्वीकारा. 
 इ-कॉमर्स बेवसाइटवर तुमची महत्त्वाची माहिती शेअर करू नका
        - रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ

संबंधित बातम्या