पुदुचेरीमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी आपल्याच पक्षातील राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टिका करत त्यांना संधीसाधू म्हटले आहे.

पुदुचेरीमधील कॉंग्रेसचे व्ही.नारायणस्वामी सरकार अखेर कोसळलं. पुदुचेरीमध्ये रविवारी नारायणस्वामी सरकारमधील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर सत्तारुढ कॉंग्रेस सरकार संकटात आलं होतं. यामुळे अखेर कॉंग्रेस सरकारला बहुमत सिध्द करावं लागलं, मात्र सरकारला सोमवारी बहुमत सिध्द करण्यात अपय़श आले. दरम्यान पुदुचेरीमध्ये जो काही राजकिय गोधंळ चालू आहे यास  मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी राजकिय वेश्याव्यवसाय चालू असल्याची टिका केली होती. पुदुचेरीमधील राजकिय वातावरण तापलेलं असतानाच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुदुचेरीचा दौरा  केला होता. यावेळी त्यांनी पुदुचेरीमधील कॉलेज विद्यार्थ्य़ांशी संवादही साधला होता. 

तर दुसरीकडे पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी आपल्याच पक्षातील राजीनामा देणाऱ्या आमदारांवर टिका करत त्यांना संधीसाधू म्हटले आहे. ''आमदारांनी पक्षासोबत आपली निष्ठा राखली पाहिजे. आता राजीनामा देणारे आमदार जनतेला सामोरे जाऊ शकत नाहीत. जनता त्यांना संधीसाधू म्हणून हाक मारेल,'' अशी टिका यावेळी नारायणस्वामी यांनी केली. 

आता पुदुचेरीमध्ये जे काही सुरु आहे तो केवळ राजकिय वेश्याव्य़वसाय सुरु आहे. पण शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. असा विश्वास नारायणस्वामी यांनी विधानसभेत बहुमत सिध्द करण्याच्य़ा आगोदर व्यक्त केला होता. भाजप हिंदी भाषा जबरदस्तीने लादण्याचा प्रय़त्न करत आहे,असा आरोपही नारायणस्वामी यांनी भाजपवर केला. तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये आम्ही दोन्ही भाषांचा वापर करत असतो मात्र भाजप हिंदी भाषा आमच्यावर थोपवत आहे. असं ते यावेळी म्हणाले.      
 

संबंधित बातम्या