मोबाईल नंबरवर फोन करण्याच्या नियमात मोठा बदल 

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जानेवारी 2021

ट्रायच्या (Telecom Rgulatory Authority of India) आदेशानुसार मोबाईलवर लॅंडलाइनवरुन कॉल करायचा असल्यास मोबाईल नंबरच्या आधी आता '0' डायल करावं लागणार आहे.आजपासून ट्रायने नवा नियम लागू केला आहे.

 नवी दिल्ली: आजपासूनच देशभरात लॅंडलाइनवरुन मोबाईलवर फोन करण्याच्या नियमात मोठा बदल होत आहे. ट्रायच्या (Telecom Rgulatory Authority of India) आदेशानुसार मोबाईलवर लॅंडलाइनवरुन कॉल करायचा असल्यास मोबाईल नंबरच्या आधी आता '0' डायल करावं लागणार आहे.आजपासून ट्रायने नवा नियम लागू केला आहे.

20 नोव्हेंबरला दूरसंचार विभगाने ट्रायच्या शिफारसीला मान्यता दिली.आणि टेलिकॉम कंपन्यांना आवश्यक ते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.या नव्या बदलामुळे टेलिकॉम कंपन्यांना नव्या फोन नंबरचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

टेलिकॉम कंपन्यांना नंबर डायल करण्याची पध्दत बदलल्यामुळे मोबाईल सेवेसाठी 254.4 कोटी नंबर नव्याने निर्माण करता येणार आहेत.दरम्यान येणाऱ्या काळात दूरसंचार कंपन्या 11 अंकी नंबरही जारी करु शकतात.देशात मोबाईल ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत असल्या कारणाने 10 अंकी नंबरही कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या