भारतातील बड्या कंपन्या घेणार कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची जबाबदारी 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 19 जानेवारी 2021

 स्टील उत्पादनात सर्वात अग्रेसर असणाऱ्या जिंदाल स्टील  कंपनी,महिंद्रा ग्रुप तसेच आयटीसी यासारख्या बड्या कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांठी कोरोना लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे.

   मुबंई:  भारतातील अनेक मोठ्या कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांठी कोरोना लसींचे डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणाबाबत यापूर्वी म्हटले होते की, 'भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे'.

कोरोनाची लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना देण्यात येणार आहे.असं असताना स्टील उत्पादनात सर्वात अग्रेसर असणाऱ्या जिंदाल स्टील  कंपनी,महिंद्रा ग्रुप तसेच आयटीसी यासारख्या बड्या कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांठी कोरोना लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे.

सरकारकडून प्राथमिक स्तरावर कोरोना लसीची मागणी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा ही लस बाजारात उपलब्ध केली जाईल त्यावेळी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेतली जाणार आसल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या