चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 'माउंटन स्ट्राईक कॉर्प्स' जवान

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

भारतीय सैन्याने ऊत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला बळकटी देणारा महत्वाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते आहे. भारतीय सैन्याने माउंटेन स्ट्राईक कॉर्प्स मध्ये सुमारे 10,000 जवानांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्ली: भारतीय सैन्याने ऊत्तरेकडील सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला बळकटी देणारा महत्वाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते आहे. भारतीय सैन्याने माउंटेन स्ट्राईक कॉर्प्स मध्ये सुमारे 10,000 जवानांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. माउंटन स्ट्राईक कोरचे जवान आता पाकिस्तानसह चीन कडून सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याचे काम करणार आहे.(Big decision of Indian Army to keep an eye on China's movements.)

राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी

भारताच्या पूर्वेकडील सीमेवर असणाऱ्या जवळपास 10,000 जवानांना आता पूर्व बंगालकडील 17 माउंटेन कोरमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती मिळते आहे. वर्षभरापूर्वी सुरु झालेल्या माउंटेन स्ट्राईक कोरला (Mountain Strike Scorps) केंद्राने मंजुरी दिली होती मात्र आता पर्यंत या कोर मध्ये फक्त एक डिव्हिजन होती. आता सैन्याने घेतलेल्या या निर्णयामुळे नक्कीच माउंटन स्ट्राईक कोरची ताकद वाढणार असल्याचे समजते आहे. भारत-चीन सीमेवर असणाऱ्या संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सैन्याला (Indian Army) बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. 

दरम्यान, गलवान (Galwan) खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन (India And China) मध्ये सीमावर्ती भागात तणावाची परिस्थती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी शांतत प्रस्थापित करण्यावर एकमत दर्शवले होते. त्याच अनुशंघाने शुक्रवारी भारत आणि चीनमध्ये सैन्यस्तरावर झालेल्या चर्चेच्या 11 व्या फेरीत  गोग्रा(Gogra), हॉट स्प्रिंग्स (Hot Springs) आणि देप्सांग भागात तैनात असलेले सैन्य मागे घेण्याच्या विषयावर चर्चा पार पडली आहे. यापूर्वी 20 फेब्रुवारीला देखील उभय देशांत सैन्य मागे घेण्याच्या विषयावर चर्चा झाली होती.  

संबंधित बातम्या