राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यात 'हे' राज्य सर्वात पुढे
ram mandir.jpg

राम मंदिरासाठी निधी गोळा करण्यात 'हे' राज्य सर्वात पुढे

अयोध्येत श्री राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देण्यात त्यांचे परम भक्त हनुमानजी आघाडीवर आहेत. राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी पाटण्यातील पटना हनुमान मंदिरातून तब्बल पाच कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे.  हनुमान मंदिर पाच वर्षांत ही रक्कम देणार असल्याची माहिती मिळते आहे. तसेच,  बिहारच्या इतर अनेक मंदिर समित्यांनीही रामजन्मभूमी मंदिर बांधकाम निधी संकलनातून पैसे दान केले आहेत.(A big donation came from Patna Hanuman Temple for Ram Temple)

रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याची मोहीम 1 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मोहिमेचा एक भाग म्हणून संकलन संघ गावागावांमध्ये फिरून निधी संकलित करत होते. रामजन्मभूमी मंदिर बांधकाम निधी संकलनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये देणगी देण्यात पटना सगळ्यात आघाडीवर आहे. या भागातून  6.25 कोटींपेक्षा जास्त रकमेची रक्कम प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे दानापूर गावातून स्वतंत्रपणे सुमारे 1.23 कोटींची देण्यात आली आहे. 

रामजन्मभूमी मंदिर (Ram Mandir) निर्माण निधी समितीने एक अॅप्लिकेश  तयार करण्यात आले आहे. ज्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून  बँकांकडील रक्कम आणि धनादेश स्पष्ट झाल्यानंतर खात्यात एकूण ठेवी आहेत हे पाहता येते. बिहारमध्ये (Bihar) कलेक्शन टीमच्या माध्यमातून 22 कोटी 80 लाख 52 हजार 629 रुपये जमा झाले आहेत. तर बँकांनी 19 कोटी 55 लाख 62 हजारांची मोजणी पूर्ण केली आहे. तसेच मोहिमेअंतर्गत जमा केलेल्या ठेवींची (Donation) मोजणी व धनादेशांची मंजुरी अद्याप सुरू आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com