मोठी बातमी. धारवाड येथे कोरोनाचे ९ रुग्ण

dainik gomantak
मंगळवार, 12 मे 2020

हे पुरूष रूग्‍ण १८ ते ३० वयोगटातील आहेत. या रूग्‍णांमध्‍ये हुबळी येथील ६, कलघटगी येथील २ आणि कोंदगोळ येथील १ रुग्ण असल्‍याची माहिती मिळाली. 

धारवाड,

 गुजरातमध्‍ये गेल्‍या अनेक दिवसांपासून अडकलेले लोक आज धारवाड जिल्ह्यात आले आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्‍याची माहिती धारवाड जिल्हाधिकारी दीपा चोळण यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले. धारवड येथे ९ जणांना कोरोनाची लागण झालेली असून येथे कोरोनाचे २१ रूग्‍ण आहेत. 
गुजरात येथून आल्यावर धारवाड येथे नोंदणी केंद्रावर नोंदणी करून ठेवण्यात आले आणि त्‍यांची थुंकी कोरोना पडताळणी चाचणीला पाठविण्‍यात आले. या ९ रुग्णांना हुबळी येथील के.मी.सी येथे दाखल करण्यात आले असून त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. 
हे पुरूष रूग्‍ण १८ ते ३० वयोगटातील आहेत. या रूग्‍णांमध्‍ये हुबळी येथील ६, कलघटगी येथील २ आणि कोंदगोळ येथील १ रुग्ण असल्‍याची माहिती मिळाली. 
कर्नाटकात आज ४२ रूग्‍णांची नोंद असून राज्‍यातील कोरोनाग्रस्‍तांचा आकडा ९०० वर पोहचला आहे. 

संबंधित बातम्या