नितीशकुमारांनी फुंकले रणशिंग

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी व्हर्च्युअल सभा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी व्हर्च्युअल सभा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या सभेत ५० लाखांपेक्षा जास्त लोक सहभागी होऊन त्यांनी नितीशकुमार यांचे भाषण ऐकल्याचा दावा पक्षाने केला आहे.

नितीशकुमार यांनी दोन तास ५९ मिनिटे असे दीर्घ भाषण केले. त्यांनी लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या सत्ताकाळातील कुशासनाचा उल्लेख करीत बिहारला आता ‘कंदिला’ची गरज नाही, नाही असा चिमटा काढला. आम्ही गेल्या निवडणुकीतच प्रत्येक घरात वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते आणि ते वेळेआधी पूर्ण केले, असे ते म्हणाले. 

लालूप्रसाद यादव यांच्या राजदचे चिन्ह कंदील आहे. नितीशकुमार यांनी भाषणात लालूप्रसाद, त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा थेट उल्लेख टाळून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

 

संबंधित बातम्या