बिहार विधानसभा निवडणूक ठरल्या वेळीच होणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर या काळातच निवडणूक होण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली: बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ठरलेल्या कालावधीतच होईल, असे निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. कोरोनामुळे काही राजकीय पक्ष ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती सांगण्यात आली आहे. 

२४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे ऑक्टोबर- नोव्हेंबर या काळातच निवडणूक होण्याचा अंदाज आहे. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने संसर्गाच्या काळात निवडणूक घेण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय इतरही काही पक्षांनी ही मागणी केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या