Bihar: विधानसभेत भाजप आमदाराने 'हनुमान चालीसा' वाचण्यासाठी जागा आणि रजा मागितली

जर तुम्हाला तुमच्या मनावर विश्वास (trust)असेल तर तुम्हाला सर्वत्र देव (God)सापडेल, जर तुमच्या हृदयात राक्षस असेल तर तुम्हाला सर्वत्र शत्रू सापडतील.
Bihar: विधानसभेत भाजप आमदाराने 'हनुमान चालीसा' वाचण्यासाठी जागा आणि रजा मागितली
BJP MLA Haribhushan Thakur BachaulDainik Gomantak

पाटणा: हिंदूंच्या (Hindu)भारतीय संस्कृतीचा (Indian culture)आणि भावननेचा (Emotion)विचार करून भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल (Haribhushan Thakur Bachaul) यांनी मंगळवारी बिहार विधानसभेत(Bihar Assembly) हनुमान चालीसा पाठ करण्यासाठी रजा आणि जागेची मागणी केली आहे. झारखंड विधानसभेत मुस्लिम समाजातील आमदार आणि कर्मचाऱ्यांना नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भाजप सातत्याने विरोध करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी बिहारमध्ये हिंदूंच्या संस्कृती साठी मागणी केली.

BJP MLA Haribhushan Thakur Bachaul
पाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस!

हिंदू धर्माच्या भावना लक्षात घेऊन, विधानसभा ज्या प्रकारे सर्व धार्मिक समुदायाचा (Religion)आदर करते, हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी वेळ आणि ठिकाणाची व्यवस्था करावी. जेणेकरून सर्व धर्म समभाव दिसतील. हरिशंकर बचौल यांनी कोणताही लेखी अर्ज दिलेला नाही. परंतु बिहार विधानसभेत अशी कोणतीही व्यवस्था असल्यास ते हनुमान चालीसाचे पठण करण्याची जागा मागतील अशी त्यांची तयारी आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी झारखंड विधानसभेत (Jharkhand Assembly)भाजप आमदारांच्या गदारोळाबद्दल बोलले आहेत. प्रार्थना करण्यासाठी जागा वाटपावरून भाजप गोंधळ घालत आहे. अशी मानसिकता राज्याच्या विकासात अडथळा आहे. त्याच वेळी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना नमाजसाठी दिलेल्या खोली क्रमांक TW-348 चे नाव प्रार्थनास्थळ म्हणून देण्याचा सल्ला दिला होता. ज्यावर ते म्हणाले की हा काही उपाय नाही. जर तुम्हाला तुमच्या मनावर विश्वास असेल तर तुम्हाला सर्वत्र देव सापडेल, जर तुमच्या हृदयात राक्षस असेल तर तुम्हाला सर्वत्र शत्रू सापडतील अश्या परखड भाषेत आपले मत त्यांनी मांडले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com