गृह मंत्रालय स्वत:कडे ठेवण्यात नितीश कुमार यशस्वी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

साधारणपणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच खात्यांचे वाटप केले जाते; मात्र बिहारमध्ये मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० तासांनंतर त्यांना खात्याचा कारभार सोपविण्यात आला.

पाटणा-बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये आता भाजपचा वरचष्मा असला तरी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना गृह आणि कार्मिक विभागासारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवण्यात यश आले आहे; मात्र विधानसभेचे अध्यक्षपद ते स्वतःच्या संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाकडे ठेवू शकले नाहीत आणि राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्यापासून भाजपला रोखण्यास ते अपयशी ठरले आहेत.

साधारणपणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही तासातच खात्यांचे वाटप केले जाते; मात्र बिहारमध्ये मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर सुमारे २० तासांनंतर त्यांना खात्याचा कारभार सोपविण्यात आला. खातेवाटपात गृह आणि कार्मिक मंत्रालयावर भाजपने दावा केला होता; मात्र नितीश कुमार यांची हे विभाग सोडण्याची तयारी नव्हती.

 काही प्रमुख नेत्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या

 मुख्यमंत्री नितीश कुमार - गृह व कार्मिक

 उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद - अर्थ आणि पर्यावरण

 उपमुख्यमंत्री रेणू कुमारी - मागास कल्याण विभाग, उद्योग आणि पंचायती राज

 विजय चौधरी-  ग्रामीण विकास आणि ग्रामीण कार्य

 विजेंद्र प्रसाद यादव - उर्जा, दारुबंदी आणि नियंत्रण

 रामसूरत राय - महसूल

संबंधित बातम्या