Viral Video : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला, पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात

पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने त्यांना केली धक्काबुक्की
bihar cm nitish kumar was punched in bakhtiyarpur patna the accused was detained by the police
bihar cm nitish kumar was punched in bakhtiyarpur patna the accused was detained by the policeDainik Gomantak

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने हल्ला केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी हल्ला (Attack) झाला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका व्यक्तीने त्यांना धक्काबुक्की केली. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. सध्या पोलीस या तरुणाला ताब्यात घेऊन कसून चौकशी करत आहेत. या व्यक्तीची मानसिक स्थिती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री (CM) एका खासगी कार्यक्रमाअंतर्गत बख्तियारपूरला गेले होते, असे सांगण्यात येत आहे.

bihar cm nitish kumar was punched in bakhtiyarpur patna the accused was detained by the police
IAF Recruitment : भारतीय हवाई दलात गट C आणि MTS पदांसाठी भरती

योगींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून पाटण्यात परतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यादरम्यान ते काही मूर्तीला हार घालणार होते. त्यानंतर जमावातील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, कालांतराने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.

मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish-Kumar) यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाल्याची माहिती आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान मधुबनी येथे झालेल्या निवडणूक सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश यांच्यावर कांदे आणि विटांनी हल्ला केला होता. यावेळी मंचावर उपस्थित मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाने मुख्यमंत्र्यांना संरक्षण दिले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com