या मुख्यमंत्र्यांपेक्षा राज्याचे अन्य मंत्री धनवान

वृत्तसंस्था
शनिवार, 2 जानेवारी 2021

बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली.

पाटणा :  बिहारमध्ये मावळत्या वर्षातील शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सर्व मंत्र्यांनी २०२० मध्ये कमावलेली संपत्ती जाहीर केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांपेक्षा त्यांचे बहुतेक सर्व मंत्री धनवान आहेत. 

नितीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे स्थावर व जंगम मालमत्तेसह सुमारे ५७ लाख रुपयांची संपत्ती आहे. यात १२ गायी, सहा वासरे याचबरोबर संगणक, वातानुकूलन यंत्र, ट्रेड मिल आणि अगदी सायकलचाही समावेश आहे. नितीश कुमार त्यांच्यापेक्षा त्यांचे चिरंजीव नितांश कुमार हे अधिक श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे सुमारे तीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यात वारसा हक्काने आलेल्या संपत्तीसह अन्य मालमत्तेचाही समावेश आहे. 

संबंधित बातम्या