बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची लागण

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी गुरुवारी दुपारी त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ट्वीट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करत आहेत. 

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी गुरुवारी दुपारी त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे ट्वीट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार करत होते. 

“माझी कोरोना चाचणी सकारात्मक आली असून,संसर्गाची पहिली पातळी आहे. ताप नाही. मागील 2 दिवस चांगल्या देखरेखीसाठी पटना येथील एम्स येथे दाखल झालो आहे. फुफ्फुसांच्या सीटी स्कॅनचे रिपोर्चसदेखील सामान्य आहेत. प्रचारासाठी लवकरच परत येईल", असे मोदी यांनी ट्विट केले. मतदान जाहीरनाम्यात भाजपने कोरोना लसीकरण जाहीर केल्यानंतर काही तासांनी ही बाब समोर आली आहे. बिहारमध्ये 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील निवडणुका आहेत.  

करोनानंतर बिहार विधानसभा निवडणूक ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी १७ जिल्ह्यांमधील ९४ जागांवर मतदान घेतले जाईल. या व्यतिरिक्त तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यांमधील ७८ जागांवर मतदान घेतले जाणार आहे. या निवडणूक निकालाची घोषणा १० नोव्हेंबर २०२० या दिवशी केले जाणार आहे.

संबंधित बातम्या