नितीश की तेजस्वी?; आज 'बिहारमें काबा'!..

नितीश की तेजस्वी?; आज 'बिहारमें काबा'!..
bihar election results

 पाटणा- उत्तर भारतातील राजकारणाचे केंद्रस्थान असलेल्या बिहारमधील या निवडणुका अनेकार्थांनी ऐतिहासिक आहेत. भाजपने लॉकडाऊनच्या काळात गाजलेल्या सुशांत सिंह प्रकरणापासून ते थेट कोरोना लशीच्या विनामुल्य वितरणापर्यंत अनेक आश्वासने देत मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. मध्येच राम मंदीर आणि पुलवामा हल्ल्यांचाही उल्लेख भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार केला जात होता. त्याला पर्याय म्हणून विरोधात बसलेल्या प्रमुख पक्षानेही तरूणांना रोजगाराचे गाजर देत पारंपरिक मुद्दे मागे सारत नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. आज निवडणुकीच्या निकालानंतर जनतेचा कौल दिसेल. 
 
एनडीएकडून मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले आहे. तर आरजेडी कॉंग्रेस यांच्या महागठबंधनने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आहे. जीडीएसएफकडून उपेंद्र कुशवाहा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. याशिवाय जन अधिकार पार्टी (लोकतांत्रिक) च्या नेतृत्वात अजून एक गठबंधन असून त्याचे नाव प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक अलायन्स असे आहे. यामध्ये आझाद समाज पक्ष, एसडीपीआय आणि बहुजन मुक्ती पक्ष सामील आहे. या गठबंधनकडून पप्पू यादव हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. याशिवाय प्लूरल्स पक्षाकडून  पुष्पम प्रिया चौधरी यांनीही त्यांच्या पक्षातर्फे स्वत:ला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
 
या निवडणुकीत कितीही पक्षांनी आपली दावेदारी पेश केलेली असली तरी निवडणूक निकाल प्रमुख दोन पक्षांवरच अवलंबून आहे. एक नितीश कुमार यांचा जनता दल पक्ष आणि दुसरा तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल. बिहारच्या राजकारणात कित्येक वर्ष आपला दबदबा असलेल्या या दोन प्रमुख पक्षांवर राज्याच्या राजकारणाची सुत्रे अवलंबून आहेत. नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी अनेक वर्षांपासून असले तरी त्यांनी तेजस्वी यादव यांनी कडवे आव्हान दिले आहे. तरूणांच्या प्रश्नांवर लक्ष वेधताना त्यांनी रोजगाराच्या मुद्याला उचलून धरले होते. विशेष म्हणजे यावेळी बिहारमध्ये सत्तापालट झाल्यास तेजस्वी हे भारतातील सर्वांत तरूण मुख्यमंत्री असतील.           

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com