Bihar च्या माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य, 'बलात्कारासारख्या घटना घडतच...'

Jitan Ram Manjhi: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
Jitan Ram Manjhi
Jitan Ram ManjhiDainikGomantak

Jitan Ram Manjhi: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे (HAM) अध्यक्ष वैशालीमध्ये म्हणाले की, 'बिहार हे मोठे राज्य आहे. बलात्कारासारख्या घटना इथे घडतच राहतात.' या वक्तव्यानंतर पोलीस-प्रशासन काय कारवाई करते, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. दोन दिवसांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील जांदा येथून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली होती. नराधमांनी या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मांझी यांच्या या वक्तव्यावरुन सध्या गदारोळ होण्याची शक्यता आहे.

मांझी पुढे म्हणाले की, 'पोलिसांनी (Police) कारवाई केली आहे. लवकरच आरोपी (Accused) पकडले जातील. नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो.' विरोधकांच्या आरोपांबाबत मांझी यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'विरोधक काहीही बोलत सुटले आहेत. बिहारमध्ये (Bihar) एक-दोन कोटी लोक राहतात. बिहारची लोकसंख्या तब्बल 12 कोटी आहे. इथे बलात्कारासारख्या घटना घडतच राहतात. अशा परिस्थितीत सरकारने या घटनेवर काय कारवाई केली हे पाहावे लागेल. सरकारने आरोपींना पकडण्यासाठी तत्काळ कारवाई करुन त्यांना अटक केल्याचे तुम्ही पाहिले असेल. विरोधकांचा सरकारला बदनाम करण्याचा डावही असू शकतो.'

Jitan Ram Manjhi
Bihar Crime News : धक्कादायक; पैशांच्या वादातून चुलत भावांनी केली भावाची हत्या

दुसरीकडे, वैशालीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर भाजपकडून नितीश कुमार सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपने त्याला जंगलराज आणि गुंडाराज म्हटले आहे.

Jitan Ram Manjhi
Bihar Politics: बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, भाजपचे वॉकआउट

तसेच, एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 गुन्हेगारांनी सामूहिक बलात्कार केला होता. चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी अजून या नराधमांना पकडलेले नाही. जीतन राम मांझी यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. मी भगवान रामाला मानत नाही, असे ते म्हणाले होते. स्वतःला माता शबरीचे वंशज असल्याचे सांगून त्यांनी भगवान रामाचे वर्णन एक काल्पनिक पात्र असे केले होते. मी वाल्मिकींवर विश्वास ठेवतो, तुलसीदासांवर नाही, असेही ते म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com